BSNL ची भन्नाट ऑफर; फक्त 151 रुपयांत मिळेल 25 OTT आणि 450 पेक्षा जास्त Live चॅनेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 17:10 IST2025-08-31T17:07:32+5:302025-08-31T17:10:09+5:30

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन आणला आहे.

BSNL : आजकल टेलिकॉम कंपन्या फक्त कॉलिंग आणि डेटाच देत नाही, तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजनाची सुविधाही करतात. अनेक कंपन्या आपल्या रिचार्ज पॅक्ससोबत OTT प्लॅटफॉर्म्सचे मोफत सब्सक्रिप्शन देतात.

यामध्ये आता BSNL चे नावही जोडले गेले आहे. कंपनीने एक BiTV Premium Pack लॉन्च केला आहे. या पॅकमध्ये युजरला एकाच अॅपमध्ये अनेक OTT प्लॅटफॉर्म्स आणि लाईव्ह चॅनेल्स पाहता येणार आहेत.

BSNL ने आपल्या BiTV सर्व्हिसची सुरुवात फेब्रुवारी 2025 मध्ये केली होती. तेव्हा ही सुविधा मोफत उपलब्ध होती. मात्र, आता कंपनीने याला एक पेड सब्सक्रिप्शन पॅकच्या स्वरुपात आणले आहे.

या नवीन प्रीमियम पॅकमध्ये युजरला 25 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस आणि 450 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहता येतील.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Premium Pack फक्त 151 रुपयांना मिळेल. याच्या वैधतेबाबत कुठलीही माहिती कंपनीने दिलेली नाही.

या पॅकमध्ये युजरला ZEE5, SonyLIV, Aha, Shemaroo, Sun Nxt Chaupal, Lionsgate, ETV Win, Discovery, Epic ON सारखे लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस मिळतो.