बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 19:33 IST2025-06-08T19:30:04+5:302025-06-08T19:33:58+5:30
BSNL on Operation Sindoor: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक जबरदस्त प्लॅन जाहीर केला आहे.

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक जबरदस्त प्लॅन जाहीर केला आहे. या प्लॅनद्वारे रिचार्ज केल्यास ग्राहकांना डिस्काऊंट तर मिळणारच आहे, शिवाय यातील काही रक्कम बीएसएनएल ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याला सलाम म्हणून सैन्यालाही देणार आहे. बीएसएनएल अशाप्रकारे एकूण ५ टक्के योगदान देणार आहे.
बीएसएनएलने हा मोठ्या व्हॅलिडिटीचा प्लॅन आणला आहे. छोट्या कालावढीसाठीच ही ऑफर असून हा प्लॅन १४९९ रुपयांचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला ३३६ दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे.
या प्लॅनमधील रकमेच्या २.५ टक्के वाटा बाजुला करून बीएसएनएल तो सैन्याला देणार आहे. तसेच तेवढाच भाग ग्राहकांना डिस्काउंट म्हणून दिला जाणार आहे.
बीएसएनएलचा ग्राहक स्वत:साठीच नाही तर देशासाठी देखील काहीतरी योगदान देणार आहे. एकूण ५ टक्के रक्कम बाजुला केला जाणार आहे. त्यातून सैन्याला २.५ टक्के आणि उरलेली २.५ टक्के रक्कम ग्राहकांना कॅशबॅक म्हणून दिली जाणार आहे.
१,४९९ रुपयांचा रिचार्ज केल्यावरी त्यातील ३७.५० रुपये संरक्षण विभागाकडे वळते केले जाणार आहेत. ग्राहकांनाही तेवढाच डिस्काउंट मिळणार आहे.
आणखी काय काय मिळणार...
संपूर्ण भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल, मोफत राष्ट्रीय रोमिंग यावर मिळणार आहे.
तसेच दररोज १०० मोफत एसएमएस करता येणार आहेत. तसेच या कालावधीसाठी एकूण २४ जीबी हाय-स्पीड डेटा दिला जाणार आहे, यानंतर मात्र ४० केबीपीएसच्या वेगाने अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे.
हा प्लॅन जास्त काळ उपलब्ध करण्यात आलेला नाही. ३० जूनपर्यंत बीएसएनएलचे ग्राहक या प्लॅनचे रिचार्ज करू शकणार आहेत.