गेमर्ससाठी गुड न्यूज! १६ जीबी रॅमसह Asus ROG Phone 5 'या' दिवशी होणार लॉन्च

By देवेश फडके | Published: February 9, 2021 06:44 PM2021-02-09T18:44:55+5:302021-02-09T18:48:41+5:30

गेमिंगसाठी खास तयार केलेल्या Asus ROG Phone स्मार्टफोनचे नवीन मॉडेल फेब्रुवारीत लॉन्च होणार असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली : आताच्या घडीला बदलत्या वेगवान तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोन्समध्येही उत्तोमत्तम फिचर्स येऊ लागले आहेत. तसेच वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन कंपन्याकडून कमी किमतीत जास्त फिचर्स देण्यात चढाओढ लागली आहे.

भारत आणि चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक चायनीज अॅप बंद केल्यानंतर देशभरातून चायनीज प्रोडक्ट्सना विरोध होऊ लागला. याचा फायदा बिगर चायनीज कंपन्यांना झाल्याचे पाहायाला मिळत आहे.

गेमिंगसाठी खास तयार केलेल्या Asus ROG Phone या स्मार्टफोनचे पाचवे व्हर्जन फेब्रुवारी महिन्यात लॉन्च होणार असल्याचे सांगितले जात आहे. Asus ROG Phone 5 या स्मार्टफोनला TENAA आणि 3C सर्टिफिकेट मिळाले आहे.

Asus ROG Phone 5 स्मार्टफोनचे काही फिचर्सही लीक झाले आहेत. Asus ROG Phone 5 हा गेमिंग स्मार्टफोन ASUS_I005DA या नावाने लिस्टेट झाला आहे. तसेच या गेमिंग स्मार्टफोनमध्ये १६ जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 888 चा प्रोसेसर देण्यात येणार असल्याचे समजते.

Asus ROG Phone 5 हा गेमिंग स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर काम करेल. गेतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात Asus ROG Phone या गेमिंग स्मार्टफोनचे ८ जीबी व्हेरियंट गीकबेंचवर दिसले होते.

Asus ROG Phone 5 या गेमिंग स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात येणार असून, 6000mAh ची बॅटरी असेल. इतकेच नाही, तर या स्मार्टफोनसोबत ६५ व्हॉटचा रॅपिड चार्जरही कंपनीकडून देण्यात येणार आहे.

Asus ROG Phone 5 या स्मार्टफोनच्या बॅक साइलाही डिस्प्ले देण्यात आल्याचे समजते. Asus ROG Phone चे मागील दोन स्मार्टफोन्स गेमर्समध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. तसेच Asus ROG Phone 3 या मॉडेलचीही गेमर्सना उत्सुकता लागून राहिली होती. Asus ROG Phone 3 नंतर आता कंपनीने थेट Asus ROG Phone 5 हा स्मार्टफोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

Asus कंपनीकडून ROG Phone 5 च्या लॉन्चिंगची अधिकृत घोषणा केली नसली, तरी काही साइट्सवरील माहिती आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार १२ फेब्रुवारीनंतर हा गेमिंग स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे.