Acer नं विद्यार्थी, शिक्षकांसाठी लाँच केले विशेष स्वस्त आणि मस्त लॅपटॉप्स; पाहा किंमत

By जयदीप दाभोळकर | Published: January 20, 2021 03:09 PM2021-01-20T15:09:01+5:302021-01-20T15:20:59+5:30

तैवानची कंपनी Acer नं विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विशेष लॅपटॉप्स लाँच केले आहेत. इतर लॅपटॉप्सच्या तुलनेत कमी किंमतीत हे लॅपटॉप्स उपलब्ध असून उत्तम स्पेसिफिशन्ससहितही येत आहेत. कंपनीनं विशेषत: विद्यार्थ्यांच्या गरजा पाहता हे लॅपटॉप्स लाँच केले आहे.

Acer च्या मॉडेल्सची नावं Acer Chromebook 511, Acer Chromebook 311, Acer Chromebook Spin 512, Acer Chromebook Spin 511 आणि Acer TravelMate Spin B3 अशी आहेत.

या लॅपटॉपची विशेष बाब म्हणजे या लॅपटॉप्सची बॅटरी बॅकअप २० तासांपेक्षा अधिक आहे. म्हणजेच एकदा चार्ज केल्यानंतरही अनेक तासांपर्यंत हे लॅपटॉप्स वापरता येऊ शकतात.

Acer Chromebook 511 (C741L) हा लॅपटॉप अमेरिकेत ३९९.९९ डॉलर्स म्हणजेच जवळपास २९,२०० रूपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर युरोपमध्ये याची किंमत ३९९ युरो म्हणजेच ३५.४०० रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.

दुसरीकडे Acer Chromebook 311 (C722) ची किंमत अमेरिकेत २९९.९९ डॉलर्स म्हणजेच २१,९०० रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. या महिन्यापासून या लॅपटॉपची विक्री सुरू होणार आहे. युरोपमध्ये या लॅपटॉपची किंमत २६९ युरो म्हणजेच २३,९०० रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. युरोपमध्ये मार्च महिन्यापासून या लॅपटॉपची विक्री करण्यात येईल.

कंपनीनं आणखी एक Acer Chromebook Spin 512 (R853TA) हा लॅपटॉप लाँच केला आहे. अमेरिकेत या लॅपटॉपची किंमत ४२९.९९ डॉलर्स म्हणजेच जवळपास ३१,४५५ रूपये आणि युरोपमध्ये याची किंमत ३९९ युरो म्हणजेच ३५,४०० रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त कंपनीनं लाँच केलेल्या Acer Chromebook Spin 511 (R753T) या लॅपटॉपची किंमत ३९९.९९ डॉलर्स म्हणजेच २९,३०० रूपये आणि युरोपमध्ये या लॅपटॉपची किंमत ३६९ युरो म्हणजे ३२,७०० रूपये इतकी ठरवण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त कंपनीनं आणखी एक लॅपटॉप लाँच केला आहे. Acer TravelMate Spin B3 laptop ची अमेरिकेतीस किंमत ३२९.९९ डॉलर्स म्हणजेच जवळपास २४ हजार १०० रूपये आमि युरोपमध्ये या लॅपटॉपची किंमत ४०९ युरो म्हणजेच ३६,३०० रूपये इतकी आहे. या लॅपटॉपची चीनमध्येही विक्री केली जाणार आहे.

Acer ने सध्या हे लॅपटॉप अमेरिका आणि युरोपियन देशांमध्येच लाँच केले आहेत. लवकरच हे लॅपटॉप भारतातही लाँच होणरा आहेत. भारतात स्वस्त आणि चांगल्या स्पेसिफिकेशन्सच्या लॅपटॉपची मोठी मागणी असते. ३० हजारांपेक्षा कमी किंमतीच्या लॅपटॉपला भारतात अधिक मागणी असल्याचं दिसून आलं आहे.

Acer च्या लॅपटॉप्समध्ये पॉवरफुल प्रोसेसर, स्टिरिओ साऊंड आणि चांगल्या व्हिडीओ क्विलिटीसह उत्तम डिस्प्ले देण्यात आला आहे. व्हेरिअंटप्रमाणे हे लॅपटॉप्स एका चार्जमध्ये १० ते २० तासांपर्यंत चालू शकतात. या लॅपटॉप्समध्ये स्टोरेज जास्त दिलं नसलं तरी जबरदस्त रॅम देण्यात आली आहे.

Read in English