Phones Under 6500: ६५०० रुपयांत जबरदस्त कॅमेरा, यादीत एकापेक्षा एक फोन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 20:57 IST2025-05-14T20:51:00+5:302025-05-14T20:57:34+5:30
50 megapixel camera Phones: कमी किंमतीत चांगला कॅमेरा असलेल्या फोन शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एफ ०५: हा सॅमसंग फोन फ्लिपकार्टवर ६,४९९ रुपयांना विकला जात आहे. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅक देखील मिळत आहे. हा फोन ६.७-इंचाच्या एचडी+ पीएलएस एलसीडी डिस्प्लेसह येतो. फोनमध्ये ग्राहकांना १३ मेगापिक्सेल+ २ मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरे मिळतो. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली.
पोको सी ७१: ६.७१-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आणि ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला पोकोचा हा बजेट फोन फ्लिपकार्टवर ६ हजार ४९९ रुपयांत उपलब्ध आहे. हा फोन ४ जीबी/६ जीबी रॅम आणि ६४ जीबी/१२८ जीबी स्टोरेज पर्यायसह येतो. खास गोष्ट म्हणजे यात ५० मेगापिक्सेल एआय कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली.
सॅमसंग गॅलेक्सी एम ०५: हा एक बजेट स्मार्टफोन आहे, अॅमेझॉनवर ६ हजार ४९९ रुपयांत विकला जात आहे. या फोनमध्ये ६.७ इंचाचा एचडी+ डिस्प्ले आणि मीडियाटेक हेलिओ जी८५ चिपसेट आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सेल + २ मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली, जी २५ वॅट फास्ट चार्जिंग मिळते.
रेडमी ए ५: गेल्या महिन्यात लाँच झालेला रेडमीचा हा फोन फ्लिपकार्टवर ६ हजार ४९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६.७१ इंचाचा मोठा एचडी+ डिस्प्ले आणि मीडियाटेक हेलिओ जी३६ प्रोसेसर आहे. या फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि २ टीबीपर्यंत स्टोरेज मिळतो. या फोनमध्ये ३२ मेगापिक्सेल एआय रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली.
आयटेल ए ५०: हा एक बजेट स्मार्टफोन आहे, जो ६.६-इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्लेसह येतो. हा फोन सध्या फ्लिपकार्टवर ६ हजार ३४५ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, यात ८ मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन अँड्रॉइड १३ गो एडिशनवर चालतो आणि त्यात ५००० एमएएच बॅटरी आहे.