12GB रॅम अन् 256GB स्टोरेज असणारे 5 तगडे स्मर्टफोन्स, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 16:20 IST2025-12-12T16:18:09+5:302025-12-12T16:20:53+5:30

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय? मग या फोन्सवर एक नजर नक्की मारा!

या वर्षी भारतातील स्मार्टफोन बाजारात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या प्रीमियम मिड-रेंज फोन्सची जोरदार एन्ट्री झाली आहे. मोठी बॅटरी, हाय मेगापिक्सेल कॅमेरे आणि फास्ट चार्जिंग हे या फोन्सचे मुख्य आकर्षण आहे. विविध ब्रँडचे टॉप मॉडेल्स त्यांच्या किंमत-फीचर्स गुणोत्तरामुळे ग्राहकांना भुरळ घालत आहेत.

OnePlus Nord CE 5 - ₹28,999:- वनप्लसचा हा फोन वर्षातील सर्वात पैसा वसूल मॉडेल्सपैकी एक मानला जात आहे. यात तुम्हाला 12GB RAM + 256GB स्टोरेज, 50MP मेन कॅमेरा आणि 7100mAhची मोठी बॅटरी मिळते. मिड-रेंजमध्ये उत्तम कॅमेरा आणि बॅटरी परफॉर्मन्स देणारा हा फोन ग्राहकांत लोकप्रिय ठरत आहे.

Samsung Galaxy F55 5G - ₹22,999:- सॅमसंगनेही या सेगमेंटमध्ये आपले नवे मॉडेल आणले आहे, जे फीचर्सच्या तुलनेत किंमत आकर्षक मानली जात आहे. यात 12GB RAM + 256GB स्टोरेज, 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह 50MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीपॅक मिळतो. फोटोग्राफी आणि सेल्फीसाठी हा फोन मजबूत पर्याय आहे.

Motorola (12GB+256GB) - ₹24,999:- मोटोरोलाचा हा मॉडेल आपल्या बॅटरी परफॉर्मन्ससाठी खास ओळखला जात आहे. यात 5500mAh बॅटरी, 68W फास्ट चार्जिंग, 50MP + 13MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा मिळतो.

Poco F7 5G - ₹30,999:- पोकोने या किमतीत दमदार बॅटरी आणि परफॉर्मन्सची सांगड घातली आहे. 12GB RAM + 256GB स्टोरेज, 7550mAhची भलीमोठी बॅटरी, 50MP मेन + 8MP सेकंडरी कॅमेरा आणि 20MP सेल्फी कॅमेरा मिळतो. गेमिंगसाठी हा फोन विशेषतः पसंत केला जात आहे.

Realme 15 Pro 5G - ₹37,999:- या सेगमेंटमधील सर्वात प्रीमियम मॉडेल्सपैकी एक मानला जाणारा हा फोन उत्कृष्ट कॅमेरा कॉन्फिगरेशनसह येतो. यात 12GB RAM + 256GB स्टोरेज, 7000mAh बॅटरी, 50MP + 50MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 50MP सेल्फी कॅमेरा मिळतो. फोटोग्राफी प्रेमी आणि हाय-एंड वापरकर्त्यांसाठी हा फोन योग्य पर्याय ठरत आहे.