पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्या चौथ्या लग्नाची बातमी व्हायरल, कोण आहे वनीझा सत्तार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 17:24 IST2026-02-28T16:51:18+5:302026-02-28T17:24:03+5:30

Shoaib Malik marriage, Who is Vaneeza Sattar: सानिया मिर्झाचा एक्स-पती शोएब मलिक तिसऱ्या पत्नीलाही घटस्फोट देणार असल्याची चर्चा

पाकिस्तानचा माजी कर्णधार व लोकप्रिय क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मलिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी त्याचे कारण त्याचे चौथे लग्न आहे.

सोशल मीडियावर अलिकडेच अशी चर्चा आहे की मलिक लवकरच पाकिस्तानी टेलिव्हिजन अभिनेत्री वनीजा सत्तारशी लग्न करू शकतो. काही वृत्तांनुसार, लग्नाची तारीख मार्च महिन्यातच असल्याचे म्हटले आहे.

शोएब किंवा वनीजा दोघांनीही या दाव्यांना दुजोरा किंवा नकार काहीच दिलेले नसले तरीही, या चर्चेमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. जर खरे असेल तर शोएब मलिकचे हे चौथे लग्न असणार आहे.

त्याने यापूर्वी आयेशा सिद्दीकी, टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि अलिकडेच अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे. त्यानंतर आता शोएब मलिका चौथ्यांदा कबूल है म्हणणार असून ती तरुणी वनीजा असू शकते.

वनीजा सत्तार ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिने मालिकांमध्ये काम केले असल्याने ती लोकप्रिय आहे. तसेच ती पाकिस्तानी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हम टीव्हीवरील 'लाडली' या नाटकात नाझो नावाच्या गुंतागुंतीच्या आणि बिघडलेल्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेने ती प्रसिद्ध झाली. या भूमिकेने तिला पाकिस्तानमध्ये ओळख मिळवून दिली.

वनीजा ही मूळची कराची येथील आहे. तिने कराची विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. वनीजा ही अतिशय चांगल्या आणि आर्थिकदृष्ट्या सबळ कुटुंबातील मुलगी असून तिचे कुटुंब उच्चशिक्षित आहे.

सोशल मीडियावर वनीजा हिचे १,२७,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती वारंवार आई आणि बहिणीसोबत फोटो पोस्ट करते. मनोरंजन जगतात वनीजा वेगाने प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे.