चॅलेंज! फोटोतील 69 नंबर शोधून थकले 90 टक्के लोक, बघा 5 सेकंदात तुम्हाला तरी दिसतो सापडतो का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 10:40 IST2025-05-17T10:24:43+5:302025-05-17T10:40:28+5:30

Optical illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवता येतं. तसेच यातील गोष्टी शोधण्यात मजाही येते.

Optical illusion: सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. असाच कन्फ्यूज करणारा फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवता येतं. तसेच यातील गोष्टी शोधण्यात मजाही येते.

या फोटोंमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. कधी काही वस्तू, कधी प्राणी तर कधी वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला एका वेगळा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 5 सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गोष्टी शोधण्यात मजा येत असली तरी हे काही सोपं काम नाही. यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे हवेत. तरंच तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकता.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला 5 सेकंदात 69 हा अंक दिसला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही जीनिअस आहात.

पण अजूनही तुम्हाला यातील 69 नंबर दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. या फोटोत तुम्ही 69 अंक सर्कल केलेला बघू शकता.