बुच'कळ्यात' पडणे, 'ओली'स धरणे अन् बरंच काही... नेटिझन्सच्या कल्पनेला तोड नाही! मराठी वाक्यप्रचारांचे भन्नाट मिम्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 09:26 AM2021-09-06T09:26:24+5:302021-09-06T09:32:12+5:30

सोशल मीडियात नेमकं काय आणि कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यात मिम्सचा पाऊस एकदा सुरू झाला की त्याचा नुसता पूर येतो. असाच मराठी म्हणींच्या हटके मिम्सचा पूर सध्या सोशल मीडियात आला आहे. पाहुयात नेटिझन्सची 'आयडिया'ची कल्पना...

मराठी वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ आपण शालेय शिक्षणात शिकलो आहोत. मराठीच्या परीक्षेत वाक्यप्रचारांचे अर्थ सांगा यासाठी १० ते १५ गुणांचा प्रश्न असतो. पण मराठी वाक्यप्रचारांचे आगळेवेगळे आणि तितक्याच धम्माल अर्थाचे मिम्स सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

बुचकळ्यात पडणे याचा अर्थ गोंधळणे, पेचात पडणे, समजेनासे होणे, काय करावे ते न कळणे असा होतो हे आपल्याला माहित्येय. पण प्लास्टिकचं बुच, कळ्यांमध्ये पडलेलं हे मिम कल्पनेला तोड नाही याचीच प्रचिती देतं.

एखाद्याला जेरीस आणणं म्हणजे काय असतं हे तुम्ही आजवर अनुभवलं असेलच. पण टॉम अँड जेरीमधल्या 'जेरी'स आणणे असं हे भन्नाट मिम पाहून तुम्हीही जेरीस आला नाहीत ना?

'नमक हलाल' चित्रपटातील 'आज रपट जायें तो' या गाण्यातील अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्या रोमँटिक सीनवरुन मराठी वाक्यप्रचाराचं असं हे मिम तयार होईल असा विचार करणं म्हणजेच खरंच नेटिझन्सच्या कल्पनाशक्तीला साष्टांग दंडवतच करायला हवं नाही का?

कंठाशी 'प्राण' येणे...

बुचकळ्यात पडणे, जेरीस आणणेच्या अभूतपूर्व यशानंतर नाकी 'नऊ' येणे...

या मिमला काही कॅप्शन देण्याची खरंच गरज आहे का?.... हातावर 'तुरी' देणे!