मराठी भाषा दिवस : मित्र-मैत्रिणींना द्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 09:02 AM2020-02-27T09:02:58+5:302020-02-27T09:46:59+5:30

मराठी भाषा दिन हा दिवस जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषा दिन ज्याला मराठी राजभाषा दिन असेही म्हणतात. हा दिवस जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.

१९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषेचा उदय संस्‍कृतचा प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झ़ाला, असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला.

देवगिरीच्या यादवांचा काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधुन लिहिली ज़ाते. इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली.

महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली.

शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याच़ा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला.

इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांचा एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला.