भारीच! लग्नानंतर पहिल्यांदाच ५८ वर्षांनी केलं फोटोशूट, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल १ नंबर जोडी
By manali.bagul | Updated: October 4, 2020 14:21 IST2020-10-04T13:35:53+5:302020-10-04T14:21:37+5:30

फोटोशूट करायची आवड सगळ्यांनाच असते. सध्या फक्त तरूण तरूणीच नाही तर सगळ्याच वयोगटातील लोक फोटोशूट करून घेण्यासाठी फार उत्साही असतात. तर काही ठिकाणी वयोवृद्ध माणसांना अजूनही नटण्या थटण्यात आणि आपले फोटो काढून घेणं म्हणजे संकोच वाटतो. सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचे फोटो व्हायरल होत आहेत. एखाद्या तरूण जोडप्यालाही लाजवतील असे या दोघांचे फोटो आहेत.

लग्न झाल्यानंतर तब्बल ५८ वर्षांनी या जोडप्यानं फोटोशूट केलं आहे. सोशल मीडियार हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. Photagrapher Athreya या सोशल मीडिया युजरने हे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी सांगितले की, मी माझ्या आजी आजोबांना त्यांच्या लग्नाच्या फोटोंबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी एकही फोटो नसल्याचे सांगितले. मग मी आई आजोबांचे फोटोशूट करायचं ठरवलं.

केरळच्या इड्डकी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या चिन्नम्मा आणि कोचूकुट्टी याचे लग्न ५८ वर्षांपूर्वी झाले. परंतु त्यांच्याकडे लग्नाची आठवण म्हणून एकही फोटो नव्हता. कोचूकुट्टी यांना फोटोशूट करण्याची खूप इच्छा होती. म्हणूनच त्यांचे मित्र आणि नातवाने मिळून या वृद्ध जोडप्याचे फोटोशूट केले.

यासाठी त्यांचा मेकअप करण्याची व्यवस्था केली तसंच आकर्षक स्थळ निवडण्यात आलं. आजोबा काळ्या रंगाचा कोट आणि आजी पांढरी साडी घालून नवीनच लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणे दिसत आहेत.

वेगवेगळे हावभाव करत, आनंद घेत त्यांना आपले फोटोशूट करून घेतले. सथ्या हे जोडपं चर्चेचा विषय ठरले आहे.

















