गुगल-जिओ 'युती'वर मीम्स 'लय भारी'; कुणाला आठवला 'मुन्नाभाई', तर कुणाला 'हेराफेरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 18:47 IST2020-07-15T18:04:34+5:302020-07-15T18:47:56+5:30

रिलायन्स जिओ आणि गुगल यांच्यात डील झाल्याची बातमी समोर आली आणि सोशल मीडियात मीम्सचा पाऊल पडला. ट्विटरवर MukeshAmbani ट्रेन्ड होत आहे.

रिलायन्स जिओ आणि गुगल यांच्यात डील झाल्याची बातमी समोर आली आणि सोशल मीडियात मीम्सचा पाऊल पडला. ट्विटरवर MukeshAmbani ट्रेन्ड होत आहे. अनेक लोक जिओ यूजर्स आणि इतर टेलिकॉम कंपन्यांची स्थिती सांगत आहेत.

बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजची अॅन्युअल जनरल मीटिंग झाली. ज्यात मुकेश अंबानी यांनी पुढील वर्षापर्यंत ५ जी ल़ॉन्च करण्याची घोषणा केली. गुगल आणि जिओ देशाला २ जी मुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यासाठी गुगलने जिओमध्ये ७.७ टक्क्याच्या भागीदारीसाठी ३३.७३७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे.