ट्रम्प यांची लेक इवांकाने घातला एक वर्ष जुना ड्रेस, पण किंमत वाचाल तर व्हाल हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 16:58 IST2020-02-24T16:24:08+5:302020-02-24T16:58:31+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प आपल्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले. सकाळी ट्रम्प हे आपली मुलगी इवांका आणि पत्नी मेलानिया हिच्या सोबत भारतात पोहोचले.
या भेटीत सगळ्यांचेच लक्ष इवांका आणि ट्रम्प यांच्याकडे होते.
भारत दौऱ्यासाठी इवांकाने निळया आणि लाल रंगाचा मिडी फ्लोअर प्रिंटचा ड्रेस घातला होता. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण इवांकाचा हा ड्रेस तब्बल एक वर्ष जुना आहे.
इवांका २०१९ मध्ये सुद्धा यात ड्रेसमध्ये नजरेस आली होती. अर्जेटिनाच्या प्रवासादरम्यान इवांकाने हाच सेमफ्रॉक घातला होता.
मागिल वर्षी सप्टेंबर महिन्यात इवांकाने हा ड्रेस घातला होता. या ड्रेसची किंमत तब्बल १ लाख ७१ हजार तीनशे एकतीस रूपये इतकी होती.
मेलानिया यांचा व्हाईट जंमसुट हेर्वे पिअरे नावाच्या प्रसिध्द अमेरिकन डिजायनरने डीजाईन केला आहे.
आज एअरपोर्टवर ट्रम्प फॅमिलीचा पहिला लूक पहायला मिळाला.
ट्रम्प यांनी लिंबू कलरचा टाय परिधान केला होता. पाश्चिमात्य देशात हा रंग आशेचे प्रतिक मानला जातो. याचा अर्थ असा की ट्रम्प यांना भारताकडून फार अपेक्षा आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधींच्या आश्रमाबाबत माहिती दिली. तसेच ट्रम्प यांनी आश्रमातील चरख्यावर सूतकताई केली.
अर्जेटिनाभेटी दरम्यान तिची हेअरस्टाईल सुद्धा वेगळी होती. त्यावेळी इवांकाने बेबी कट केलेला. पण आता तिचे केस मोठे झाले आहेत..