भारतीयांच्या मजेशीर मीम्सची इवांकांना भुरळ, फोटो शेअर करत केलं भन्नाट ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 10:06 IST2020-03-02T09:10:27+5:302020-03-02T10:06:08+5:30
फोटोशॉपच्या मदतीने अनेक मीम्स तयार करण्यात आले आहे. इवांका यांनी त्यांच्यावर तयार केलेले मीम्सही स्वत: आनंदाने ट्विट केले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले होते. अमेरिका आणि भारत यांच्यात होणाऱ्या सुरक्षा करारासाठी त्यांचा हा दौरा होता. ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणि जावईदेखील होते.
भारत दौऱ्यानंतर इवांका अमेरिकेला परतल्या आहेत. अमेरिकेमध्ये गेल्यावर त्यांनी भारतात घालवलेले सुंदर क्षण आणि फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ताजमहाल पाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. भारताकडून झालेला पाहुणचार मनाला भावला असल्याने पुन्हा ताजमहाल पाहण्यासाठी येऊ असं त्यांनी सांगितलं.
भारत दौऱ्यादरम्यान करण्यात आलेल्या उत्तम आदरातिथ्याबद्दल इवांका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
इवांका यांच्या भारत भेटीसंदर्भात सोशल मीडियात अनेक मजेशीर मीम्स व्हायरल झाले आहेत. ताजमहालसोबतच इवांका यांना भारतीयांनी बनवलेले मीम्सही प्रचंड आवडले आहेत.
फोटोशॉपच्या मदतीने अनेक मीम्स तयार करण्यात आले आहे. इवांका यांनी त्यांच्यावर तयार केलेले मीम्सही स्वत: आनंदाने ट्वीट केले आहेत.
'इवांका ताजमहाल बघण्यासाठी मागे लागली होती. मग काय मी तिला दाखवला ताजमहाल', असं दिलजीत दोसांजने फोटोसोबत ट्वीट केलं. दोसांजचं हे ट्वीट व्हायरल झालं. या ट्विटला इवांका यांनी त्याच अंदाजात उत्तर दिलं.
सोशल मीडियावर हे मीम्स जोरदार व्हायरल झाले आहेत. पंजाबी गायक दिलजीत दोसांज आणि इवांका यांचा फोटो खूप जास्त व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या मीम्सला इवांका यांनी उत्तर दिलं आहे.
शानदार ताजमहाल दाखवल्याबद्दल आभार दिलजीत दोसांज. हा अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव होता असं इवांका यांनी म्हटलं आहे.
भारतीयांचे हृदयापासून आभार मानते. भारत दौऱ्यात खूप मित्र मिळाले असं इवांका यांनी म्हटलं आहे.
इवांका यांनी आणखी एका ट्विटमध्ये इतर अनेक मीम्स शेअर केले. सोशल मीडियावर हे मीम्स जोरदार व्हायरल झाले आहेत.
ट्रम्प कुटुंबाने आग्रा येथील ताजमहाल येथे भेट दिली. इवांका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ताजमहालसमोरचा पतीसोबत हातात हात घेतलेला सुंदर फोटो ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत.
ताजमहाल भेटीवेळी इवांकाने गाईडला अनेक प्रश्न विचारले, त्यानंतर ताजमहालला पुन्हा येण्याची इच्छाही व्यक्त केली. पती जेरेडसोबत इवांका यांनी खूप फोटो काढले.
Thank you India! असं ट्विट इवांका यांनी केलं आहे. इवांका ताजमहालच्या प्रेमात पडल्या. पती जेरेडसोबत त्यांनी मनसोक्त फोटो काढले आहेत.