तिच्या नावाचा टॅटू, लग्नही केलं; पण निघाली तृतीयपंथी, मग तरुणानं जे केलं त्यानं सर्व हादरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 02:19 PM2023-01-06T14:19:41+5:302023-01-06T14:51:38+5:30

उत्तर प्रदेशमधील ही घटना वाचून तुम्हाला धक्काच बसेल.

लग्नानंतर पती-पत्नीमधील भांडण, मारामारी अशा सर्व प्रकारच्या कथा तुम्ही अनेकदा पाहिल्या आणि ऐकल्या असतील, पण उत्तर प्रदेशमधील ही घटना वाचून तुम्हाला धक्काच बसेल.

मिळालेल्या माहितीनुसार, भूपेंद्र नावाच्या व्यक्तीचे लग्न झाले होते, ती तृतीयपंथी असल्याचे आढळून आले. यानंतर दररोज सदर तृतीयपंथीला भूपेंद्र आणि सासरच्या लोक मारहाण करत होते.

यानंतर भूपेंद्रच्या कुटुंबियांनी आपल्या मुलाचे लग्न त्याच्या मेहुणीशी करुन देण्यास सांगितले. मात्र त्यावेळी मेहुणी अल्पवयीन असल्याने ती वयात आल्यावर आम्ही लग्न लावून देतो असं तृतीयपंथीच्या कुटुंबियांनी भूपेंद्र आणि त्याच्या कुटुंबियांना आश्वासन दिलं.

सदर मेहुणी वयात आल्यानंतर भूपेंद्रच्या घरच्यांनी तिला पुन्हा त्या वचनाची आठवण करून दिली, पण पुन्हा सासरच्यांनी तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर भूपेंद्रने आत्महत्या केली. भूपेंद्रने उचललेल्या या पावलाने दोन्ही कुटुंबांना हादरवून सोडले. दु:खी होऊन घरी आलेल्या भूपेंद्रने घरात गळफास लावून घेतला.

फेसबुकवर पोस्ट करत भूपेंद्र म्हणाला की, माझ्या आई-वडिलांचा काहीही दोष नाही. माझ्या पत्नीने मला खूप मारले आहे. म्हणूनच मी आत्महत्या करत आहे. प्रत्येक गोष्टीचे कारण माझी पत्नी आहे. यामुळे मी मरत आहे. तसेच भूपेंद्रने आपल्या छातीवरील पत्नीच्या नावाचा टॅटू चाकूने खरवडून पुसण्याचा प्रयत्न केला पण तो करू शकला नाही.

सदर संपूर्ण प्रकरण यूपीच्या इटावा जिल्ह्याशी संबंधित आहे. जिथे चाकरनगरच्या पिपरौली गढिया गावात राहणाऱ्या भूपेंद्रचे २०१७मध्ये लग्न झाले होते.

भूपेंद्रच्या म्हणण्यानुसार, काही काळ सर्वकाही ठीक होते. त्याने आपल्या छातीवर पत्नीच्या नावाचा टॅटूही काढला होता. मात्र भूपेंद्रला लग्न झालेली व्यक्ती तृतीयपंथी असल्याचे कळले.