शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संपूर्ण जगात 'हे' फुल कुठेही सापडणार नाही ते फक्त आढळतं मणिपुरमध्येच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 4:23 PM

1 / 6
मणिपूरमध्ये 16 ते 19 ऑक्टोबरदरम्यान शिरुई लिली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचा मुख्य उद्देश दुर्मिळ असलेल्या शिरुई लिली या फुलाचं रक्षण करण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोजन केलं जातं.
2 / 6
तसेच उखरूलमधील पर्यटन वाढविण्यासही मदत होणार आहे. या फेस्टीवलचं आयोजन राज्य पर्यटन विभागाकडून केलं जातं. हा महोत्सव 5 दिवसांसाठी आयोजित केला जातो.
3 / 6
उखरूल हा मणिपूर राज्यातील सर्वात उंचीवर असणारा जिल्हा आहे. हे शिरुई फुल उंचावरील डोंगरावर आढळून येतं. हे फुल फक्त जगात मणिपूरमध्ये आढळून येतं.
4 / 6
या दुर्मिळ फुलाचा शोध फ्रैंक एफ किंग्डम नावाचे ब्रिटिश वनपतीशास्त्रज्ञ यांनी 1946 मध्ये लावला होता. त्यापूर्वी शिरूई लिली नावाच्या फुलाची माहिती कोणालाही नव्हती.
5 / 6
1948 मध्ये लंडनमधील रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटीने शिरुई लिली फुलाला मेरिट प्राइजने गौरविण्यात आलं होतं.
6 / 6
1948 मध्ये लंडनमधील रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटीने शिरुई लिली फुलाला मेरिट प्राइजने गौरविण्यात आलं होतं.