Dasara Wishes In Marathi : तुमच्या मित्रांसाठी आणि नातेवाईकांसाठी खास शुभेच्छापत्रे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 09:40 AM2019-10-07T09:40:07+5:302019-10-07T10:25:42+5:30

आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा साजरा केला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन,सरस्वती पूजन , अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. या दिवशी आपल्या मित्रांना, आप्तांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास शुभेच्छापत्रे घेऊन आलो आहोत. या माध्यमातून तुम्ही सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा द्या.