डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला रुग्णालयात काम करतानाचा फोटो, पण एका चुकीमुळे झाले ट्रोल....

Published: October 5, 2020 03:27 PM2020-10-05T15:27:06+5:302020-10-05T15:38:56+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो व्हायरल होत असून लोकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही फोटो पोस्ट करण्यात आले आहे. या फोटोमध्ये ट्रम्प रुग्णालयात काम करत असल्याचे दिसून येत आहेत. पण हा फोटो झूम करून पाहिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प ज्या कागदावर काम करत आहेत. तो कागद कोरा असल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवरून ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. हे फोटोशूट #Staged या हॅशटॅगने ट्रेंड होत आहे. हे फोटो वाल्टर रीड मेडिकल सेंटरचे आहे. या मेडिकल सेंटरमधून ट्रम्प यांनी शनिवारी एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला होता. कोरोना संक्रमण झाल्यानंतर ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया याच रुग्णालयात दाखल झाले होते.

ट्रम्प यांची मुलगी इवांका हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर करत सांगितले की, अमेरिकेच्या लोकांसाठी काम करण्यापासून ट्रम्प यांना कोणीही रोखू शकत नाही. कोरोनाने संक्रमित असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी निगडीत असलेला हाच मुद्दा ट्रम्प समर्थकांनी वर उचलला असून राष्ट्राध्यक्षपदासाठी योग्य असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता डोनाल्ड ट्रम्प पांढरा शर्ट घालून लांबच लांब कॉन्फ्रेंस टेबलाजवळ बसले आहेत. एका फाईलवर पेनाने मार्किंग करत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये टेबलवर बसून पेपरावर काही लिहीताना डोनाल्ड ट्रम्प दिसून आले आहेत.

दरम्यान एअर करेंटचे एडिटर चीफ यांनी या दोन्ही फोटो पहिल्यानंतर यातील फरक सांगितला आहे. या दोन फोटोंमध्ये १० मिनिटाचे अंतर आहे. ट्रम्प वेगवेगळ्या ठिकाणी बसून काम करत आहेत. पहिला फोटो संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी तर दुसरा ५ वाजून ३५ मिनिटांनी काढला आहे.

व्हाइट हाऊचे पत्रकार एंडू फेनबर्ग यांनी या फोटोचो विश्लेषण करताना सांगितले की, ट्रम्प को पांढऱ्या कागदावर आपलं नाव लिहित आहे. त्यानंतर ट्विटर अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली.

कोणी टीव्हीस्टार तर कोणी फोटो शूट करण्यासाठी रुग्णालयत गेले असल्याचे म्हटले आहे. एका सोशल मीडिया युजरने मुद्दाम कोऱ्या कागदावर सही करत असल्याचा टोला लगावला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!