क्या बोनस है रे बाबा! बोनसची वाट पाहण्याच्या नादात नेटकऱ्यांनी पाडला भन्नाट मीम्सचा पाऊस; पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 12:24 IST2020-11-09T12:00:01+5:302020-11-09T12:24:56+5:30

हे संपूर्ण वर्ष कोरोनाच्या माहामारीमुळे मास्क आणि सॅनिटायजर वापरण्यात जात आहे. वेगवेगळे सण उत्सव साजरे करतानाही अनेक बंधन घालण्यात आली आहेत. आता दिवाळी काही दिवासांवर आली. दिवाळी म्हटलं की, घराघरात चर्चा होते ती म्हणजे बोनसची, दिवाळीचा बोनस आल्यानंतर लोक खरेदीसाठी प्लॅनिंग करतात.

सध्या कोरोनामुळे अनेक खासगी कंपन्यांमध्ये बोनस मिळणार नसल्यामुळे लोकांमध्ये निराशा आहे. सरकारी कर्मचारी वर्गाला बोनस मिळाल्यामुळे सोशल मीडियावर खासगी विरुद्ध सरकारी कंपनीचा बोनस यावरून भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

ट्विटरवर हे मीम्स तुफान व्हायरल झाले आहेत.

हाहाहा.......




















