'मेरी उम्र के नौजवानों...बाहर न आना ओ दीवानो...' दिल्ली मेट्रोचं लोकांना भन्नाट 'गाणेदार' आवाहन....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 02:23 PM2020-06-13T14:23:17+5:302020-06-13T14:43:25+5:30

कोरोना व्हायरसमुळे सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जणू देशाची अर्थव्यवस्था रस्त्यावर आली आहे. दिल्लीची लाइफलाईन म्हटल्या जाणाऱ्या दिल्ली मेट्रोची स्थितीही वाईट आहे. पण अशातही दिल्ली मेट्रो विभागाकडून एका खास अंदाजात कोरोनाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम सुरू केलंय.

डीएमआरसीकडून सध्या त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवर लोकांना काळजी घेण्याचा सल्ला देत आहे. दिल्ली मेट्रो प्रशासनाने बॉलिवूडच्या काही लोकप्रिय गाण्यांचा आधार घेऊन सोशल डिस्टेंसिंग आणि सॅनिटायजरचं महत्व पटवून सांगितलं आहे.

यात 'कभी-कभी' या टायटल सॉन्गद्वारे लोकांना आरोग्य सेतु अॅपचं महत्व सांगितलं गेलंय. डीएमआरसीकडून जागरूकतेसाठी सुरू केलेला हा नवा फंडा लोकांना फारच आवडलाय.

तसेच 'कर्ज' सिनेमातील लोकप्रिय 'मेरी उमर के नौजवानों' या गाण्याच्या बोलांच्या माध्यमातून लोकांना घरातच राहण्याचा आग्रह केलाय. लोकांना अपील करण्यात आलं आहे की, ते केवळ गरज असेल तर घराबाहेर पडावं.

एकत्र बसण्यासोबत, बोलताना एक योग्य अंतर ठेवण्याबाबतही गमतीदार पद्धतीने मेसेज देण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीही सोशल डिस्टंसिंगबाबत काही फोटोंच्या माध्यमातून जागरूकता करण्यात आली होती.

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्क घालण्यावर जोर देण्यात आला आहे. डीएमआरसीने लोकांना हेही गाण्याच्या माध्यमातून समजावून सांगितलं आहे

याचप्रकारे सोशल डिस्टेंसिंगमध्ये लोकांपासून 6 फूट अंतर ठेवण्यासाठी 'शोले' सिनेमातील एका गाण्याची मदत घेण्यात आली आहे. कोविड 19 पासून बचाव करण्याचा हा प्रयत्न तरूणांना फारच पसंत पडला आहे.

WHO कडून सुरूवातीपासूनच लोकांना साबण किंवा सॅनिटायजरने हात धुण्याचा सल्ला दिला जात आहे. हेल्थ एक्सपर्टची ही सूचना डीएमआरसीने गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे.