चिमुकल्याने चॉकलेट समजून गिळली घडाळ्याची बॅटरी, कराव्या लागल्या तब्बल २८ शस्त्रक्रिया...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 07:31 PM2021-07-12T19:31:20+5:302021-07-12T19:56:19+5:30

लहान मुलं सर्रास एखादी गोष्ट उचलून तोंडात घालण्याच्या मागे असतात. हातात मिळेल ती गोष्ट तोंडात पहिल्यांदा खायची असते. मात्र अशा गोष्टींमुळे अनेकदा चिमुकल्यांच्या जीवाला धोका पोहोचतो.

एका चिमुकल्यानं एक लहानशी वस्तू खाल्ली आणि त्याच्या जीवावर बेतलं.

एक वर्षाच्या चिमुकल्यानं चक्क चॉकलेच समजून घड्याळाचा सेल गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली.

या चिमुकल्यानं बटनाच्या आकाराचा सेल टॉफी समजून गिळला. या चिमुकल्याला त्यानंतर रुग्णालयात दाखल करावं लागलं.

तब्बल 28 शस्त्रक्रियेनंतर या चिमुकल्याचा जीव वाचवण्यात आला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या चिमुकल्याचे रुग्णालयातील फोटो त्याच्या वडिलांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार या चिमुकल्यानं बटणाच्या आकाराचा सेल गिळल्यानंतर त्याचा जीव वाचण्याची केवळ 10 टक्के शक्यता होती.

डॉक्टरांनी त्याच्या पालकांना सांगितलं की तो पूर्णपणे बरा होणं कठीण आहे.

चिमुकल्याला खाण्यासाठी जेव्हा त्रास जाणवू लागला तेव्हा डॉक्टरकडे दाखवण्यात आलं

चिमुकल्याला खाण्यासाठी जेव्हा त्रास जाणवू लागला तेव्हा डॉक्टरकडे दाखवण्यात आलं.सुरुवातीला डॉक्टरने उपचार केले मात्र हा त्रास वाढत गेला.

चिमुकल्याचा एक्स रे काढण्यात आला. त्यावेळी धक्कादायक सत्य समोर आलं. हा एक्स रे पाहून वडील आणि डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली.