तब्बल ५३० फूट उंचीवरुन मारली उडी, पण पॅराशूट उघडलाच नाही!, पुढे काय झालं? तुम्हीच पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 05:23 PM2021-04-06T17:23:53+5:302021-04-06T17:31:40+5:30

ब्रिटनमध्ये एका बेस जंपरसोबत मोठी दुर्घटना घडली. या जंपरनं ५३० फूट उंचीवरुन उडी घेतली पण ऐनवेळी त्याचं पॅराशूट उघडलंच नाही. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात...

ब्रिटनमध्ये एका बेस जंपरनं डोंगरावरुन उडी घेतली. पण उडी घेतल्यानंतर त्यानं परिधान केलेलं पॅराशूट ऐनवेळी उघडलच नाही. ५३० फूट उंचीवरुन उडी घेतलेल्या जंपरचा प्रराशूट न उघडल्यामुळं तो जमिनीवर आदळला.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीस आणि अॅम्ब्युलन्सला फोन करुन दिली. सदर ठिकाणी एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीनं दुर्घटनाग्रस्त बेस जंपरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

कोस्टगार्डच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, रविवार सकाळी त्यांना एक फोन आला की एक व्यक्ती डोंगरावरुन उडी घेऊन जखमी झाला आहे. त्यानतर कोस्टगार्ड रेस्क्यू टीमनं घटनास्थळावर धाव घेतली. जखमी व्यक्तीला एअरलिफ्ट करण्यात आलं आणि ब्रायटन येथील रुग्णालयात दाखल केलं गेलं.

बीची हेड नावाचा डोंगर ब्रिटरनमधील सर्वात उंच आहे. जो समुद्र सपाटीपासून जवळपास १६२ मीटर उंच आहे. याठिकाणी जवळपासच्या परिसरातील अनेक लोक बेस जम्पिंगसाठी येथे येत असतात.

बेस जम्पिंग आणि स्काय डायव्हिंग हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. बेस जम्पिंगमध्ये इमारती, टॉवर्स, सरळ निमूळते कडा असलेले डोंगर यावरुन पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतली जाते.

स्काय डायव्हिंगमध्ये विमान किंवा हेलिकॉप्टरमधून पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतली जाते.

बेस जंपर पॅराशूट परिधान करतात. पण काहीजण पॅराशूट ऐवजी विंगसूट देखील वापरणं पसंत करतात. या सूटला अत्याधुनिक पद्धतीनं तयार केलेलं असतं. हवेत उडी घेतल्यानंतर वेगाला नियंत्रित करण्यासाठी विंगसूटमधून मदत मिळते.

बेस जम्पिंगचा जगातील खतरनाक खेळांमध्ये समावेश होते.