एक लग्नाची अन् एक प्रेमाची, अशा या दोघीजणी; एकाच वेळी बनला 'हा' दोन बायकांचा धनी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 01:24 PM2020-03-04T13:24:29+5:302020-03-04T13:30:40+5:30

अनेकदा आपण ऐकलं असेल की, प्रियकर आणि प्रेयसी पळून जावून लग्न करतात. लग्न नाही झालं तर विरहामुळे आत्महत्या करतात. पण उत्तर प्रदेशात एक अजब घटना घडली आहे.

एका प्रियकराची दोन प्रेयसी आमनेसामने येतात, तेव्हा काय घडेल याची कल्पना तुम्हाला असेलच, कधी कधी अशा प्रियकराला चोप दिल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

उत्तर प्रदेशात अशाच प्रकारे एक प्रियकर आपल्या प्रेयसीची लग्न करण्यासाठी मंदिरात पोहचला तेव्हा त्यांच्यासमोर एक्स गर्ल फ्रेंड आली. त्यानंतर या प्रियकराने काय केले असेल? याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल ना!

हा प्रियकर आपल्या प्रेयसीला घेऊन लग्न करण्यासाठी मंदिरात आला. तेव्हा त्याची जुनी प्रेयसीही तिथे पोहोचली. तेव्हा गोंधळ उडाला असता प्रियकराने दोघांच्या कपाळी सिंदूर भरला आणि लग्न केले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजची आहे.

प्रयागराजमध्ये एक अनोखा विवाह प्रकरण समोर आला असून या युवकाने एका मुलीसोबत नव्हे तर दोन मुलींशी लग्न केले आहे. या अनोख्या लग्नाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना प्रयागराजमधील कर्नलगंजमधील धाररिया परिसरातील आहे.

या युवकाचे एका मुलीवर प्रेम होते आणि लग्नाआधीच युवकाच्या मैत्रिणीने त्याला धमकावले की, जर त्याने लग्न केले नाही तर विष पिऊन मरुन जाईन, या प्रकरणावरुन दोघांमध्ये भांडणं सुरु होती.

भांडणादरम्यान प्रियकराने प्रेयसीच्या कानाखाली वाजवली. याबाबत मुलीने पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या प्रियकराला अटक केली होती.

प्रियकर आपल्या परिसरातील मुलीवर प्रेम पहिल्यापासून प्रेम करत होता. काही वर्ष या दोघांचे प्रेम प्रकरण सुरु होतं. चार दिवसांपूर्वी या प्रियकराच्या पहिल्या प्रेमिकेने त्याला दुसऱ्या मुलीसोबत पाहिले त्यानंतर दोघांमध्ये भांडणं झाली.

प्रियकर आपल्या परिसरातील मुलीवर प्रेम पहिल्यापासून प्रेम करत होता. काही वर्ष या दोघांचे प्रेम प्रकरण सुरु होतं. चार दिवसांपूर्वी या प्रियकराच्या पहिल्या प्रेमिकेने त्याला दुसऱ्या मुलीसोबत पाहिले त्यानंतर दोघांमध्ये भांडणं झाली.

सोमवारी संध्याकाळी जेव्हा प्रियकर नव्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पोहचला त्यावेळी तिथे पूर्वीची प्रेयसीही पोहचली. तेव्हा गोंधळ झाला. त्यानंतर या प्रियकराने मंदिरात सर्वांसमोर दोन्ही प्रेयसीची लग्न केले.

टॅग्स :लग्नmarriage