कारच्या ब्रँडनेमवरुन भन्नाट मिम्स, तुम्हीही हसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 14:48 IST2021-12-02T14:34:12+5:302021-12-02T14:48:24+5:30
सोशल मीडियामुळे अनेकांची क्रिएटीव्हीटी समोर आली आहे. भन्नाट मिम्स आणि जोक्स सोशल मीडियातून व्हायरल होत असतात. तर, अफलातून आयडियाही समोर येतात.

सोशल मीडियामुळे अनेकांची क्रिएटीव्हीटी समोर आली आहे. भन्नाट मिम्स आणि जोक्स सोशल मीडियातून व्हायरल होत असतात. तर, अफलातून आयडियाही समोर येतात.

सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये गाड्यांच्या ब्रँडनेमवरुन मिम्स बनविण्यात आले आहेत. हिंदी-मराठी या दोन्ही भाषेत ही मिस्स पाहून तुम्हाला हूस आवरणार नाही.

अल्टो, वेरना या कारच्या नावाला अनुसरुन काही मिम्स बनविण्यात आले आहेत. तर, Altis या नावावरुन तू कवा आलतीस हा मराठी मिम्स बनला आहे

क्वालीस या कारच्या मॉडेलला अनुसरुन गावावरुन क्वालिस म्हणजेच गावावरुन कवा आलीस हा भन्नाट मिम बनला आहे

wagnor या कारच्या ब्रॅडनेमवरुन मी असाच वागणार हा मिम तयार झालाय

Asta या कारवरुन, जाऊ दे रे हे जग असंच Asta हा मिम्स बनविण्यात आलाय.

Vista या कारच्या नावावरुन प्रेमाची आग विझता विझत नाही, असं म्हटलंय

VDI कारच्या ब्रँडनेमवरुन हिला आळूची वडी आवडते, असा भन्नाट मिम्स तयार झालाय

















