अरे बाप रे बाप! बघा कशी केली १९६ किलो वजनी गोरिलाची टेस्ट, ८ लोकांनी मिळून टाकली नाकात नळी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 18:08 IST2020-07-16T18:01:27+5:302020-07-16T18:08:56+5:30
मियामीतील प्राणी संग्रहालयातील या गोरिलाचं नाव आहे शांगो. शांगोची कोरोना टेस्ट करण्यात आली. ३१ वर्षीय शांगोची तब्येत अचानक त्याचा लहान भाऊ बार्नीसोबत भांडल्यावर बिघडली होती.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील कोट्यवधी लोक संक्रमित झाले आहेत. सोबतच मरणाऱ्यांचा आकडाही फार वाढला आहे. अनेकदा अशाही बातम्या समोर आल्या की, काही प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाली. पण याचे काही पुरावे सापडले नाहीत.

अशात मियामी येथील प्राणी संग्रहालयातील एका गोरिलाला सर्दी झाली होती. त्यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. गोरिलाला हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध करून त्याची टेस्ट करण्यात आली.

मियामीतील प्राणी संग्रहालयातील या गोरिलाचं नाव आहे शांगो. शांगोची कोरोना टेस्ट करण्यात आली. ३१ वर्षीय शांगोची तब्येत अचानक त्याचा लहान भाऊ बार्नीसोबत भांडल्यावर बिघडली होती. तो जखमी झाला होता. सोबतच त्याला तापही आला होता.

दरम्यान शांगोला बेशुद्ध केलं गेलं आणि त्यानंतर त्याचा स्वॅब घेण्यात आला. त्याच्या या टेस्टचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. यावेळी शांगोच्या इतरही काही टेस्ट करण्यात आल्या. यात टीबीचाही समावेश होता. भावासोबत भांडताना शांगो जखमीही झाला होता. त्यावर उपचार करण्यात आले.

ऑपरेशन थिएटरमध्ये अशाप्रकारे शांगोची टेस्ट करण्यात आली. यावेळी त्याच्या लंग्सचीही तपासणी केली गेली. डॉकटरांना कोरोनाचा एकही सिम्प्टम मिस करायचा नव्हता. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे शांगोची तपासणी केली.























