World Theatre Day 2025: नाटक जगलेल्या मराठी सुपरस्टार अभिनेत्री! भूमिका जगणाऱ्या उत्कृष्ट कलावंत..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 12:36 IST2025-03-27T12:28:57+5:302025-03-27T12:36:37+5:30
World Theatre Day 2025: superstar actresses who lived the drama! : चित्रपटांबरोबरच नाटकांमध्येही उत्कृष्ट भूमिका करणाऱ्या अभिनेत्री. रंगमंच त्यांनी गाजवला.

मराठी नाटक गाजवणारी तसेच चित्रपट आणि मालिका गाजवणारी कलाकार म्हणजे भक्ती बर्वे. पु.ल देशपांडे यांच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले.
नयनतारांनी अनेक नाटके गाजवली. नंतर मराठी चित्रपटांमध्येही बऱ्याच भूमिका केल्या. बनवाबनवी मधली म्हातारी या नावाचे त्या ओळखल्या जाऊ लागल्या.
किल्ला सारखा चित्रपट करणारी अमृता सुभाष नाटकामध्ये काम करण्याला प्राधान्य देते. गंभीर भूमिका अगदीच सहज साकारण्याची कला तिला अवगत आहे.
मुक्ता बर्वे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक अशी कलाकार आहे जी सर्व प्रकारच्या भूमिका उत्कृष्टपणे करू शकते. चित्रपट आणि नाटक दोन्ही इंडस्ट्रींमध्ये तिचा जम बसला आहे.
प्रिया बापट चित्रपटांमुळे जरी प्रसिद्ध झाली असली तरी नाटकप्रेमी तिला तिच्या नाटकांमधील भूमिकांसाठीच ओळखतात. ती फार नाटक सिनेमे करत नाही. मात्र जे करते त्यामध्ये भूमिका छान साकारते.
वर्षा उसगांवकरने अनेक चित्रपट केले त्याचप्रमाणे अनेक नाटकांमध्येही काम केले. अजूनही करते. काही हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले.
सुकन्या कुलकर्णी-मोने चित्रपटांमध्ये छाप सोडतेच मात्र एकेकाळी नाटकक्षेत्रामध्ये त्यांचे नाव फलकावर असायचेच. विनोदी, गंभीर कोणतीही भूमिका असो त्या लोकांना आवडतातच.
कविता लाड-मेढेकर जास्त चित्रपटांमध्ये किंवा नाटकांमध्येही दिसत नाही मात्र जेवढ्यांमध्ये काम केले तेवढ्या सगळ्या भूमिका प्रसिद्ध झाल्या. प्रशांत दामले आणि कविता ही नाटक गाजवणारी जोडी श्रोत्यांच्या हृदयात आहे.
रोहिणी हट्टंगडी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारतात. मात्र त्यांची चार चौघी नाटकातील भूमिका फार गाजली. त्यांनी याआधीही अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे.
पर्ण पेठे चित्रपटांमध्ये फार कमी दिसते. मात्र अनेक नाटकांमध्ये काम करताना पर्ण दिसते. नवीन पिढीतील नाटक क्षेत्रातील उभरती कलाकार म्हणून तिच्याकडे बघितले जाते.