शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

इडली-डोशाच्या पिठावर 'वि़ड्याचे पान' ठेवा आणि कमाल पहा! इडल्या मऊलुसलुशीत तर डोसा होईल कुरकुरीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2026 19:05 IST

1 / 9
आपल्याकडे दक्षिण भारतीय पदार्थ जसे की इडली, डोसा किंवा उत्तप्पा घराघरात आवडीने खाल्ले जातात. हे पदार्थ मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी त्याचं बॅटर व्यवस्थित आंबणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकदा हवामान, तापमान किंवा इतर कारणांमुळे बॅटर नीट फुलत नाही, आंबटपणा कमी - जास्त होतो आणि चव बिघडते. अशावेळी आपल्या पारंपरिक स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक साधा उपाय खूप उपयोगी ठरतो - तो म्हणजे बॅटरवर नागवेलीचं पान ठेवणं. हा छोटासा उपाय बॅटरच्या फर्मेंटेशन प्रक्रियेला मदत करतो आणि इडली - डोसा अधिक चविष्ट होतो.
2 / 9
कदाचित हे ऐकून नवल वाटेल, पण या एका पानामुळे इडली - डोशाच्या बॅटरचे टेक्श्चर आणि चव पूर्णपणे बदलू शकते. हे नक्की कसं काम करतं आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात.
3 / 9
नागवेलीच्या पानामध्ये नैसर्गिकरीत्या काही एन्झाईम्स आणि बॅक्टेरिया असतात जे पिठाला आंबवण्याच्या प्रक्रियेला वेग देतात. विशेषतः थंड हवामानात जेव्हा पीठ आंबायला वेळ लागतो, तेव्हा हे पान जादूई काम करते.
4 / 9
पीठ व्यवस्थित फसफसून वर आल्यामुळे त्यातून तयार होणाऱ्या इडल्या अतिशय मऊ आणि कापसासारख्या पांढऱ्याशुभ्र होतात. हॉटेलसारखी जाळीदार इडली हवी असेल, तर हा उपाय नक्की करून पहा.
5 / 9
नागवेलीच्या पानात अँटी - बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे बॅटरमध्ये अनावश्यक बॅक्टेरियांची वाढ होत नाही आणि पीठ जास्त वेळ ताजे राहण्यास मदत होते.
6 / 9
कधीकधी पीठ जास्त आंबल्यामुळे त्याला एक प्रकारचा उग्र आंबट वास येतो. नागवेलीचे पान पिठातील आम्लता संतुलित ठेवते, ज्यामुळे पिठाचा नैसर्गिक सुगंध टिकून राहतो.
7 / 9
विड्याचे पान पचनासाठी उत्तम मानले जाते. पिठात हे पान ठेवल्याने त्यातील काही औषधी गुणधर्म पिठात उतरतात, ज्यामुळे इडली किंवा डोसा खाल्ल्यानंतर पोट जड वाटत नाही किंवा गॅसेसचा त्रास होत नाही.
8 / 9
बॅटर चांगलं फर्मेंट झाल्यामुळे डोसा छान कुरकुरीत आणि टेस्टीलाही भारी लागतो.
9 / 9
बॅटर तयार झाल्यावर त्यावर एक स्वच्छ धुवून घेतलेले नागवेलीचे पान ठेवा. बॅटर तयार करून भांड्यात ओतल्यानंतर त्यावर स्वच्छ नागवेलीचं पान ठेवा. झाकण लावून ८ ते १० तास फर्मेंट होऊ द्या. पानाचे देठ पिठात किंचित बुडलेली असावी. पीठ पूर्ण आंबल्यावर पदार्थ बनवण्यापूर्वी हे पान काढून टाका.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीkitchen tipsकिचन टिप्सCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.Home remedyहोम रेमेडी