शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फायद्याची गोष्ट! स्टील-ॲल्युमिनिअम की तांबे? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:14 IST

1 / 9
चांगल्या आरोग्यासाठी चांगलं अन्न आवश्यक आहे. लोक ताज्या भाज्या निवडतात, चांगले मसाले आणि तेल वापरतात, परंतु अनेकदा स्वयंपाकासाठी योग्य भांडी निवडायला विसरतात. भाज्या, मसाले किंवा तेलासोबतच भांडी देखील अत्यंत महत्त्वाची आहेत. कोणत्या भांड्यात जेवण बनवणं आरोग्यासाठी चांगलं आहे हे जाणून घेऊया...
2 / 9
बहुतेक भारतीय घरातत स्वयंपाकासाठी स्टेनलेस स्टीलची भांडी वापरतात. स्टेनलेस स्टील हा स्वयंपाकासाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम पर्याय मानला जातो. स्टेनलेस स्टील कोणत्याही अन्नासोबत रिएक्ट करत नाही आणि हार्मोनल बॅलेन्ससाठी चांगलं आहे. म्हणून तुम्ही दररोज स्वयंपाकासाठी स्टेनलेस स्टीलची भांडी वापरू शकता.
3 / 9
काही लोक अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करतात. ही भांडी हलकी आणि स्वस्त आहेत, परंतु समस्या अशी आहे की अ‍ॅल्युमिनियम आंबट पदार्थांसह (जसे की टोमॅटो किंवा लिंबू) रिएक्ट दरत. दीर्घकाळ वापरल्याने शरीरात अ‍ॅल्युमिनियमचे प्रमाण वाढू शकतं.
4 / 9
लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने शरीराला लोह मिळतं, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जे अन्नात दीर्घकाळ उष्णता टिकवून ठेवते. मात्र आंबट पदार्थ जास्त काळ त्यात शिजवू नयेत. तसेच, स्वयंपाक करण्यापूर्वी लोखंडी भांडी नीट स्वच्छ करून घ्यावीत.
5 / 9
तांबे हे उष्णतेचे चांगले वाहक आहे, म्हणजेच अन्न लवकर आणि पूर्णपणे शिजते. नेहमी टिन किंवा स्टीलने कोटींग तांब्याची भांडी वापरणं अत्यंत आवश्यक आहे.
6 / 9
भारतात पितळ्याच्या भांड्याचा वापर केला जातो. शरीराचं संतुलन राखण्यासाठी ती वापरलं जातात असं मानलं जातं. आधी पितळ्येच्या भांड्याचा खूप वापर केला जात असे.
7 / 9
जर तुमची सिरेमिक भांडी १००% लीड-फ्री असतील तर ती सुरक्षित असतात. ती स्लो कुकिंगसाठी आणि बेकिंगसाठी चांगली असतात. ती नाजूक असल्याने लवकर तुटू शकतात.
8 / 9
नॉनस्टिकची भांडी ही कमी तेलात स्वयंपाक करण्यासाठी उत्कृष्ट आहेत. मात्र मोठ्या आचेवर त्याचा वापर करू नयेत. कोटींग खराब झालं असेल तर भांडी बदलून घ्या.
9 / 9
प्रत्येक भांड्याचे स्वत:चे फायदे आणि तोटे असतात. कोणतेही भांडं परफेक्ट नसतं. योग्य भांडी योग्य पद्धतीने वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे. स्टेनलेस स्टील किंवा लोखंडी भांडी दैनंदिन वापरासाठी सुरक्षित मानली जाऊ शकतात.
टॅग्स :foodअन्नkitchen tipsकिचन टिप्सHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स