गरमागरम समोसे, गोडगोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:52 IST2025-07-16T12:41:07+5:302025-07-16T12:52:22+5:30
तुम्ही कधी विचार केला आहे का की चटकदार स्वादिष्ट पदार्थांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?

समोसा आणि जिलेबी हे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. तर दुसरीकडे पिझ्झा आजकाल प्रत्येक पार्टी, आउटिंग आणि मुलांच्या आवडत्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की चटकदार स्वादिष्ट पदार्थांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?
आरोग्याच्या दृष्टीने यापैकी कोणता पदार्थ सर्वात हानिकारक आहे... गरमा गरम समोसा, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा? न्यूट्रिशनिस्ट डॉ. करुणा चतुर्वेदी यांनी प्रत्येक अन्नपदार्थामागे एक गोष्ट असते. त्याचा केवळ चवीवरच नाही तर पोषण आणि आरोग्यावरही परिणाम होतो.
समोसा
समोसा हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. त्यात बटाटा, मसाले, मैदा वापरला जातो आणि नंतर ते तळला जातो. मैदा आणि डीप फ्रायमुळे, त्यात जास्त ट्रान्स फॅट असतात जे कोलेस्ट्रॉल वाढवतात.
एका समोसामध्ये सुमारे ३०० कॅलरीज असतात. वारंवार गरम केलेल्या तेलात तळल्यास ते कार्सिनोजेनिक घटक तयार करू शकतात, जे शरीरासाठी घातक आहेत.
जिलेबी
जिलेबीमध्ये असलेली रिफाइंड शुगर धोकादायक आहे. जिलेबीमध्ये १००-१५० कॅलरीज असतात, परंतु त्यात कोणतेही फायबर किंवा प्रोटीन नसतात.
जिलेबीत असलेली साखर आणि रिफाइंड कार्ब्स रक्तातील साखर वेगाने वाढवतात. सतत सेवन केल्याने मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोगांचा धोका वाढतो.
पिझ्झा
पिझ्झामध्ये अनेक गोष्टींचा वापर केला जातो जे चव वाढवतात, परंतु आरोग्याचं नुकसान करतात. पिझ्झाच्या एका स्लाईसमध्ये २५०-३५० कॅलरीज असतात.
पिझ्झामध्ये सॅच्यिरेटेड फॅट्स, सोडियम आणि प्रोसेस्ड इंग्रेडिएंट्स असतात. यामुळे रक्तदाब, हृदयरोग आणि वजन वाढू शकतं.
सर्वात धोकादायक काय?
हे तिन्ही अन्नपदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्यास हानिकारक आहेत. समोसामधील ट्रान्स फॅट आणि डीप फ्रायिंग हा सर्वात मोठा धोका आहे.
अनेक लोकांना जिलेबी खायला प्रचंड आवडते. जिलेबीमधील साखर आणि कॅलरीज आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात.
पिझ्झामधील सॅच्युरेटेड फॅट आणि प्रक्रिया केलेले घटक हृदय आणि यकृतासाठी हानिकारक आहेत. लहान मुलांना पिझ्झा जास्त आवडतो.
विशेष म्हणजे समोसा आणि जिलेबी लगेच तयार करून गरमा गरम खायला दिले जातात, मात्र पिझ्झाचा बेस हा आधीच तयार केलेला असतो. पौष्टिक गोष्टी खाऊन आरोग्याची काळजी घ्या.