१० पदार्थ-१० फायदे! शरीरातील प्रत्येक अवयवाची क्षमता वाढवणारे १० पदार्थ- न चुकता खा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 13:41 IST2026-04-12T15:13:08+5:302026-04-13T13:41:22+5:30

10 Foods That Are Good For Specific Body Parts (Which Food Detox Your Body) : अननसातील ब्रोमेलेन नावाचे घटक स्वादूपिंडाची सूज कमी करतात आणि ते स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.

आपल्या शरीरातील विविध अवयवांना नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी विशिष्ट खाद्यपदार्थ अत्यंत महत्वाचे ठरतात शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी योग्य आहार कसा निवडावा समजून घेऊ. (Which Food Detox Your Body)

दररोज भरपूर पाणी पिण्यासोबतच तुम्ही लिंबू पाणी घेतल्यानं किडनीतील विषारी घटक बाहेर पडतील आणि किडनी चांगली राहण्यास मदत होईल. (Foods That Detox Your Body)

सफरचंदात असलेले पेक्टिन फायबर यकृतातील विषारी घटक बाहेर काढण्यास आणि आतड्यांची स्वच्छता करण्यास मदत करते.

पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाईम्स असतात जे पचनमार्ग स्वच्छ करतात आणि बद्धकोष्टतेचा त्रास कमी होतो.

डाळिंब रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करून रक्ताभिसरण सुधारते आणि रक्त शुद्ध करते.

गाजरात असणारे व्हिटामीन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी उत्तम मानले जाते.

अंजीरातील फायबर्समुळे जुनाट मळ साफ होतो आणि मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता वाढते.

अननसातील ब्रोमेलेन नावाचे घटक स्वादूपिंडाची सूज कमी करतात आणि ते स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.

कोरफड आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यानं शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचा चमकते