शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पदार्थात मीठ घालण्याची अचूक वेळ कोणती? कित्येक वर्षे स्वयंपाक करणाऱ्यांनाही माहिती नसतं आरोग्याचं सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2026 14:39 IST

1 / 6
कोणत्याही पदार्थाची चव तेव्हाच खुलते जेव्हा त्यात मीठ असतं. एखाद्यावेळी तिखटाचं प्रमाण कमी- जास्त झालं तरी चालून जातं. बिना तिखटाचं जेवणही आपण करू शकताे. पण मीठ मात्र प्रत्येक पदार्थात असायलाच हवं.
2 / 6
मीठ हे केवळ पदार्थाला चव देत नाही. तर त्यामध्ये असणारं आयोडीन शरीरासाठी खूप गरजेचं असतं. पण बहुसंख्य महिला पदार्थांमध्ये मीठ घालताना एक चूक करतात आणि त्यामुळे मग मिठातलं आयोडीन शरीराला पुरेशा प्रमाणात मिळत नाही.
3 / 6
हे टाळायचं असेल तर पदार्थामध्ये मीठ घालण्याची योग्य वेळ कोणती हे एकदा लक्षात घ्यायला हवं.
4 / 6
आहारतज्ज्ञ असं सांगतात की कित्येक घरांमध्ये जेव्हा भाजी फोडणीसाठी कढईत घातली जाते तेव्हा लगेचच तिच्यामध्ये मीठ घातलं जातं. किंवा भाजी वाफवून घेण्याच्या आधी त्यात मीठ घातलं जातं.
5 / 6
पण असं केल्याने मिठामधलं आयोडीनचं प्रमाण कमी कमी होत जातं. हे टाळायचं असेल तर मीठ घालण्याची अचूक वेळ जमायला हवी.
6 / 6
एक्सपर्टच्या मते जेव्हा तुम्ही केलेला पदार्थ पुर्णपणे तयार झालेला आहे, तेव्हा गॅस बंद करण्याच्या अगदी ५ ते १० मिनिटे आधी त्या पदार्थात मीठ घालावं. यामुळे आयोडीनचा पुरेपूर लाभ शरीराला मिळतो.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.Healthआरोग्य