उन्हाळ्यामध्ये काय खावे आणि काय टाळावे? दुर्लक्ष करू नका, खाण्याच्या सवयी महत्त्वाच्याच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2025 20:24 IST2025-03-16T20:15:08+5:302025-03-16T20:24:28+5:30

What to eat and what to avoid in summer? Don't ignore it, eating habits are important : उन्हाळ्यामध्ये टाळायलाच हवे हे पदार्थ. जाणून घ्या शरीरासाठी काय गरज असते.

उन्हाळ्यामध्ये खाण्या-पिण्याचे काही नियम पाळावेच लागतात. कारण उष्णतेचा मारा शरीरावर इतका जास्त होत असतो की आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही पदार्थ असतात जे उन्हाळ्यामध्ये पोटात जायलाच हवेत. तर काही पदार्थ खाणे टाळलेलेच बरे. जाणून घ्या कोणते पदार्थ खावेत आणि कोणते नाही.

उन्हाळ्यामध्ये तिखट पदार्थ खाणे टाळावे तिखट पदार्थांमध्ये भरपूर उष्णता असते. उन्हामुळे शरीरातील उष्णता आधीच वाढलेली असते त्यामध्ये उष्ण पदार्थ खाल्यावर शरीराला त्रास होतो.

तिखट पदार्थांऐवजी साधे सात्विक अन्न खावे. भात, डाळ, चपाती, साधी भाजी असा आहार ठेवावा. आन्नामध्ये थंड पदार्थांचा समावेश करावा.

लोणच्यासारखे खारयुक्त पदार्थही जरा कमीच खावे. त्यामध्ये खुप तेल असते. ते तेल घशाशी येते. उलट्याही होतात. लोणच्याऐवजी कोशिंबीर खावी.

फळे हवी तेवढी खा. फळांमुळे शरीराला काही तोटा होत नाही. मात्र पपईसारखी उष्ण फळे खाताना जरा जपूनच खा. आंबा खाणे तर हमखास बाधते, त्यामध्ये उष्णताच तेवढी असते.

काकडी, टोमॅटो सारख्या फळभाज्या उन्हाळ्यात नक्कीच खायला हव्या. त्याचा त्रास होत नाही उलट पोटाला आधारच मिळतो.

उन्हाळ्यामध्ये तळलेले तेलकट पदार्थ खाणे टाळा. पचनासाठी ते चांगले नाहीच तसेच त्वचेसाठीही चांगले नाही.

पेय भरपूर प्या. फळांचे ज्यूस, सरबत, ताक, नारळ पाणी आदी द्रव्ये पित राहा. शरीराला गरजेचा असलेला थंडावा मिळतो.