जी-स्पॉट म्हणजे काय? महिलांची उत्तेजना-लैगिंक समाधान यामुळे खरंच वाढते का? डॉक्टर सांगतात..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 06:20 PM2023-12-23T18:20:26+5:302023-12-23T18:47:38+5:30

Where is The G-spot in Women and What Does it Do : आपल्या जोडीदाराशी मोकळा संवाद असल्यास लैंगिक सुख वाढते. ते नसेल तर लैंगिक संबंध त्रासदायक वाटू लागतात.

आपली सेक्स लाईफ चांगली असावी असं प्रत्येकालाच वाटतं. जर दोघे जोडीदार लैंगिक नात्यात समाधानी असतील तर दुरावा येत नाही. पुरुष आणि महिला दोघांसाठीही ऑरगॅझम तितकाच महत्वाचा असतो. जेव्हा महिलांच्या लैगिंक आरोग्याबद्दल बोलले जातं तेव्हा जी-स्पॉट असा शब्द अनेकदा ऐकला जातो.

१९५० मध्ये जर्मन गायनॅकलोजिस्टने याबद्दल माहिती दिली होती. अन्स्र्ट गेफेनबर्ग असे या डॉक्टरचे नाव होते. याच्या पहिल्या अक्षरावरून जी स्पॉट असं नाव देण्यात आलं.

तज्ज्ञांच्या मते जी-स्पॉट एक युरेथ्रल स्पंज आहे जो उत्तेजित झाल्यानंतर हा स्पंज मोठा होतो. यामुळे उत्तेजना वाढण्यास मदत होते. अनेकांना असं वाटतं की जी-स्पॉट असे काही नसते ज्यामुळे महिला ऑरगॅझमचा आनंद घेऊ शकत नाहीत.

जी स्पॉट नेमका कुठे असतो, जी स्पॉट कसा असतो याबाबत स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. प्रिया शाह यांनी एका हेल्थ वेब पोर्टलला अधिक माहिती दिली आहे.

जी स्टपॉट याला ग्रेफेनबर्ग स्पॉट असंही म्हटलं जातं. जी स्पॉटबाबत अनेकांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. योनीच्या वरच्या भागावर संवेदना जाणवतात. तज्ज्ञांच्यामते हा स्पॉट योगीच्या आत जवळपास २ ते ३ सेंटीमीटरवर असतो.

काहीजणांच्या मते याला स्पर्श केल्यास उत्तेजना अधिक वाढतात तर काहींना लघवी करण्याची इच्छा होते. कारण हे मुत्राशयाच्या खाली असते. या ठिकाणी स्पर्श केल्याने सुख वाटते.

जी स्पॉटचा एखादं ठिकाण निश्चित नसते. काही महिलांना स्तनांना स्पर्श केल्यानंतर उत्तेजना जाणवतात. काही महिलांना जी स्पॉटला पार्टनरने वारंवार स्पर्श केल्यास आवडते तर काहींना आवडत नाही. आपल्या जोडीदाराशी मोकळा संवाद असल्यास लैंगिक सुख वाढते. ते नसेल तर लैंगिक संबंध त्रासदायक वाटू लागतात.

एका संधोधनानुसार ६० टक्के लोकांचे म्हणणे होते की त्यांना अंधारात सेक्स करणे आवडते. यात महिलांची संख्या जास्त होती. ६४ टक्के महिला सांगतात की लाईट बंद करुन संबंध ठेवणं योग्य वाटतं.

पुरेशा शास्त्रीय आणि शारीरिक माहितीचा अभाव, गैरसमज, भीती यामुळेही महिलांना पुरेसं लैंगिक सुख कधी लाभत नाही.