खिचडीला इंग्लिशनमध्ये काय म्हणतात? IAS-IPS यांना माहीत नसेल उत्तर, तुम्हाला जमतंय का पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 15:32 IST2023-08-06T15:25:13+5:302023-08-06T15:32:30+5:30
What is Khichdi called in English : लोणचं, पापड, तूपाबरोबर खाल्ली जाणारी खिचडी एक हलका आणि पौष्टीक आहार आहे.

भारतात सर्वांच्याच घरी भात किंवा भाताशी संबंधित इतर पदार्थ खाल्ले जातात. खिचडी हा त्यापैकीच एक असलेला पदार्थ आहे. डाळ- तांदळाची पौष्टीक खिचडी खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात.
लोणचं, पापड, तूपाबरोबर खाल्ली जाणारी खिचडी एक हलका आणि पौष्टीक आहार आहे.
भारताव्यतिरिक्त मध्य पूर्व देशांमध्ये आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये खिचडी प्रसिद्ध आहे. खिचडी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली जाते आणि खिचडीची नावेही वेगवेगळी आहेत.
संस्कृत भाषेतील खिच्चा या शब्दावरून खिचडी हा शब्द आला आहे. खिचडीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात याबाबत अनेकांना कल्पना नाही.
इंग्रजी नाव
खिचडीला इंग्रजीत Hotchpotch, Medley, Kedgree असं म्हणतात. साधारणपणे खिचडी या शब्दाला खिचडीच म्हणले जाते.
खिचडीला भारताचे प्रमुख अन्न म्हटले तर वावगे ठरणार नाही. शेकडो वर्षांपासून खिचडी भारताच्या प्रत्येक भागात खाल्ली जात आहे
खिचडी खाल्ल्याने अपचन थांबते, खिचडी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय मधुमेह टाळण्यास मदत होते, वात, पित्ता आणि कफ रोखण्यासाठी खिचडी उपयुक्त आहे यामुळे निरोगी आणि चमकदार त्वचा मिळते.