तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 16:13 IST2025-04-21T15:59:59+5:302025-04-21T16:13:50+5:30

रात्री जेवताना भात का खाऊ नये हे जाणून घेऊया....

प्रत्येक घरात भात खाल्ला जातो आणि बऱ्याच लोकांना रात्रीच्या जेवणात भात खायला आवडतो. मात्र रात्री भात खाणं तुमच्या आरोग्यसाठी फारसं चांगलं नसल्याचं आता समोर आलं आहे.

भातातून तुम्हाला एनर्जी आणि पोषक तत्वं मिळतात पण रात्रीच्या जेवणात तो खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेच रात्री जेवताना भात का खाऊ नये हे जाणून घेऊया....

भातामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, जे शरीराला एनर्जी देतात. रात्री शारीरिक हालचाली कमी असताना कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने कॅलरीज फॅट म्हणून साठवल्या जाऊ शकतात.

झोपेच्या वेळी शरीरातील मेटाबॉलिज्म मंदावतं, ज्यामुळे भातामधून मिळाणाऱ्या अतिरिक्त कॅलरीज बर्न करणं कठीण होतं, ज्याने कालांतराने वजन वाढू शकतं.

पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो, म्हणजेच तो ब्लड शुगर लेव्हल लवकर वाढते. यामुळे टाइप २ डायबेटीस आणि मेटाबॉलिज्म समस्यांचा धोका वाढू शकतो.

रात्री भात खाल्ल्यानंतर अनेकांना पोट फुगणे आणि पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे पचनक्रिया मंदावू शकतात, रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्याने एसिडिटी, गॅस होऊ शकतो, ज्यामुळे झोपेचा त्रास होतो.

रात्री नियमितपणे भात खाल्ल्याने पोटावरचे फॅट्स जास्त वाढू शकतात आणि नंतर वजनही वाढतं.

पांढरा तांदूळ हा एक रिफाइंड कार्बोहायड्रेट आहे ज्यामध्ये फायबरचा अभाव असतो आणि त्याचे जास्त सेवन केल्याने पोटाभोवती फॅट्स स्टोरेज वाढू लागतं.

भातामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो एसिड असतं जे तुम्हाला रिलॅक्स करण्यास मदत करतं परंतु रात्री भात खाल्ल्याने तुम्हाला सकाळी ताजेतवानं वाटत नाही आणि दिवसभर आळस जाणवतो.