शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

समीरा रेड्डीने शेअर केली खास वेटलॉस रेसिपी- झटपट होणारा पौष्टिक पदार्थ- सहज जमेल कुणालाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2026 12:04 IST

1 / 6
अभिनेत्री समीरा रेड्डी हिने ओट्स आणि चिया सीड्स असणाऱ्या एका अतिशय पौष्टिक डोशाची रेसिपी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(weight loss recipe shared by actress Sameera Reddy)
2 / 6
हा डोसा वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठी तसेच मधुमेहींसाठी ही खूप पौष्टिक ठरणारा आहे. (oats and chia seeds dosa recipe)
3 / 6
ओट्स- चिया सीड्स डोसा करण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटी ओट्स घ्या आणि मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या.(how to make oats and chia seeds dosa?)
4 / 6
त्यामध्ये दोन टेबलस्पून चिया सीड्स घाला.
5 / 6
आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, आलं- लसूण पेस्ट, लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचे वाटण असं सगळं घालून ताक घाला. आणि हे मिश्रण कालवून १० मिनिटे झाकून ठेवा.
6 / 6
त्यानंतर गॅसवर डोसा करण्याचा तवा ठेवून नेहमी साधे डाळ तांदळाचे डोसे करतो तसे छोटे छोटे डोसे करा.यामध्ये तुम्ही गाजर, सिमला मिरची, पत्ताकोबी, कांदा, टोमॅटो अशा तुमच्या आवडीच्या भाज्याही किसून घालू शकता. जेणेकरून त्याची चव तर आणखी खुलेलच पण पौष्टिकताही वाढेल.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्सSameera Reddyसमीरा रेड्डी