कळकट गाऊन घरात घालता आणि पाहुणे आले की कपडे बदलायची धावपळ? हे ६ नाइट सूट वापरा बिंधास्त-दिसा स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2026 18:21 IST2026-01-13T18:14:05+5:302026-01-13T18:21:17+5:30

? Use these 6 night suits to look beautiful all day, be comfortable and stay happy : सुंदर नाईट ड्रेस जे दिसतात अगदी डिसेंट. पाहा नवीन मस्त पॅटर्न.

घरात आरामदायी कपडे घालण्यात जे सुख आहे ते दुसऱ्या कशातच नाही. पण अचानक पाहुणे आले किंवा काही सामान आणायला बाहेर जायचे असेल तर कपडे बदलावे लागतात. त्याचा फार कंटाळा येतो.

असे काही नाईट सुट्स आहेत जे दिसायला अगदी सुंदर असतात. जे फार आरामदायी असतात आणि घरी पाहुणे आले तरी धावपळ करुन बदलायची गरज पडत नाही. जवळपासच बाहेर जातानाही वापरु शकता.

कॉटनचा टॉप आणि पायजामा सेट अगदी सुंदर दिसतो. तसेच वापरायलाही सोपा आणि बाजारात आरामात उपलब्ध होतो.

आजकाल ट्रेंडींग असलेला एक प्रकार म्हणजे कॉटन शर्ट आणि सैलसर अशी पॅण्ट. गडद रंगाचे असे सेट्स फारच छान दिसतात. नक्की वापरुन पाहा.

रुंद बाह्या आणि सैल फिटिंग असलेला कफ्तान प्रकारचा नाईट ड्रेस अतिशय आरामदायी असतो. दिसायलाही एलिगंट वाटतो आणि घरी वावरताना सहज वापरता येतो.

शॉर्ट कुर्ता आणि प्लाझो असाही नाईट सुट मिळतो. तो वापरायला अगदीच सोपा आणि आरामदायी असतो. कॉटनचा असल्यामुळे शरीरालाही छान वाटतो. मऊ असतो.

जर तुम्हाला थ्री फोर्थ पॅण्ट आवडते तर हा प्रकार आणि वरती टीशर्ट फार छान दिसते. हा प्रकार फार आधीपासून ट्रेंडींग आहे. नक्की वापरा.