बागेतल्या रोपांनाही आवडतं साखर घातलेलं दूध! एक गोड उपाय, कुंडीतल्या रोपांसाठी खास टॉनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 19:59 IST2025-04-30T13:31:39+5:302025-04-30T19:59:41+5:30

दूध आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे, हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे घरात अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच दूध प्यायला दिलं जातं.(use of milk and sugar for plants)
हेच दूध बागेतल्या रोपांसाठीही अतिशय उपयुक्त ठरतं. त्यासाठी ते नेमक्या कशा पद्धतीने रोपांना द्यावं ते पाहूया. याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ gardening.999 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.(best home made fertilizer for plants growth)
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की बागेतल्या रोपांना १ लीटर पाण्यात १ ग्लास दूध आणि १ चमचा साखर घालून द्या. यामुळे रोपांची वाढ जोमात होते. रोपं अधिक वेगाने वाढतात.
बऱ्याचदा रोपांची पानं सुकलेली किंवा पिवळी पडलेली दिसतात. या पानांचा रंग छान गर्द, चमकदार हिरवा व्हावा यासाठी पाण्यामध्ये साखर घालून रोपांना द्यावं.
शुगर आणि व्हाईट व्हिनेगर पाण्यामध्ये एकत्र करा. ते पाणी १५ दिवसांतून एकदा रोपांना द्या. यामुळे रोपांना नवी पालवी फुटायला मदत होते.
रोपांना भरपूर फुलं येण्यासाठी साखर आणि बिअर हे मिश्रण एकत्र करून द्यावं. रोपांवर खूप चांगला परिणाम दिसून येईल.