शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

..म्हणून लेकीचा असतो वडिलांवर जास्त जीव! ५ कारणांमुळे लेकीसाठी वडिलांची माया फार महत्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2025 17:12 IST

1 / 7
मुलगी आणि वडील यांचं नातं हे जगातलं सगळ्यात निरागस, प्रेमळ आणि अनोखं मानलं जातं. तिचा सगळ्यात जास्त जीव आपल्या बाबांवर असतो. त्यांच्यासोबत खेळणं, शिकणं आणि हट्ट करणं अशा अनेक गोष्टी असतात. वडील म्हणजे तिचे पहिले हिरो, संरक्षण कवच आणि आधारस्तंभ. (father daughter relationship)
2 / 7
पण मुलगी आणि वडीलांचं हे नातं एवढं खास का आहे? यामागची ५ मोठी कारणं जाणून घेऊया. (why daughters love their dads)
3 / 7
वडील आपल्या मुलीवर नि:स्वार्थीपणे प्रेम करतात आणि प्रत्येक पावलांवर त्यांचा तिला पाठिंबा मिळतो. तिला प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जाण्याचा सल्ला ते देतात. वडिलांकडून मिळालेला हा पाठिंबा तिला मानसिक बळ आणि आत्मविश्वास देतो.
4 / 7
प्रत्येक मुलीला स्वत:ची काही स्वप्ने असतात. भविष्यात त्यांना काही तरी साध्या करायचे असते. तिच्या आयुष्यात काहीही झालं तरी “बाबा आहेत ना” हा विचार तिला निर्धास्त ठेवतो.
5 / 7
वडिलांच्या मांडीवर बसलेली, त्यांच्यासोबत खेळणारी मुलगी पाहून कधी कधी आईलाही त्यांच्या नात्याचा हेवा वाटतो. कारण मुलीच सर्वात जास्त प्रेम तिच्या बाबांवर असते.
6 / 7
तिला तिचे बाबा सगळ्यात चांगले आणि जवळचे मित्र वाटतात. म्हणून ती त्यांना सर्व काही बिनधास्त शेअर करु शकते.
7 / 7
वडील मुलीच्या चेहऱ्यावर हसू ठेवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी मुलीचं मन खुश करतात ज्यामुळे ती कायम आनंदी राहते.
टॅग्स :Parenting Tipsपालकत्व