Independence Day 2025 : पाहा तिरंगी दागिने, एरव्ही न मिळणारे कानातले-गळ्यातले; दिसतात सुंदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2025 18:34 IST2025-08-13T15:46:51+5:302025-08-13T18:34:23+5:30

तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्सच्या, युनिक पॅटर्न्स असणाऱ्या दागिन्यांची आवड असेल तर १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त ट्रेण्डिंग असणारे हे काही दागिने लगेच बघा आणि घेऊन टाका..
अशा पद्धतीच्या तिरंगा बांगड्यांचे कित्येक वेगवेगळे प्रकार बाजारात पाहायला मिळत आहेत. असे तिरंगा दागिने एरवी वर्षभर पाहायला सुद्धा मिळत नाहीत.
हातभर बांगड्या आवडत नसतील तर अशा पद्धतीचे तिरंगा गोठही बाजारात आहेत. किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही ते मागवू शकता.
अगदी तिरंगा कानातलेही बाजारात आले असून यामध्ये झुमके, मोठे टॉप्स असे कित्येक प्रकार उपलब्ध आहेत.
लहान मुलींसाठी तिरंगा हेअरबॅण्ड किंवा रबरबॅण्डही तुम्ही घेऊ शकता.
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी लहान मुलींना शाळेत लावून जाण्यासाठी हा बॅण्ड छान वाटेल.
गळ्यातल्यांमध्ये तर केशरी, पांढरा आणि हिरवा असे कॉम्बिनेशन असणारे कित्येक प्रकार आले आहेत.
असे छानसे नेकलेस गळ्यात असेल तर तुमचा स्वातंत्र्य दिन थीम लूक अगदी परफेक्ट होईल.