जाडजूड मांड्या? घट्ट पॅण्ट नको, वापरा हे ६ प्रकार, मांड्या दिसतील सुडौल-वापरायलाही कम्फर्टेबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2025 16:24 IST2025-10-17T16:12:41+5:302025-10-17T16:24:23+5:30
Thick thighs? Don't wear tight pants, use these 6 types, your thighs will look shapely - comfortable to wear too : थीक थाईज असतील तर वापरा हे पॅण्ट पॅटर्न.

प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरावर सुंदर दिसणारे कपड्यांचे पॅटर्नही वेगवेगळे असतात. अनेक महिलांच्या मांड्या जाड असतात. त्यात लाज वाटण्याची काहीच गरज नसते. खरे तर योग्य प्रकारचा पोशाख केल्यास शरीर आणखी सुंदर दिसते.
मांड्या जाड असतील तर हाय वेस्ट स्ट्रेट पॅण्ट्स फार सुंदर दिसतील.
फ्लेअर्ड ट्राऊझर वापरा. पायांना आराम मिळतो. तसेच त्वचा ओढली जात नाही.
प्लाझो हा प्रकार तसाही फार ट्रेंडींग आहे. कुर्ता किंवा शॉर्ट कुर्तीखाली नक्की घाला.
ए-लाइन स्कर्ट्स कंबर आणि हिप्सना सुंदर आकार देतात. शरीर मस्त आकर्षक दिसते.
कुलॉट्स म्हणजेच गुडघ्यापर्यंत किंवा थोड्या लांब असणाऱ्या रुंद शॉर्ट्ससारख्या पँट्स. थिक थाईज लपवून फॅशनेबल लूक देतात.
स्ट्रेचेबल जॉगर पँण्ट्स वापरा. आरामदायी, सॉफ्ट फॅब्रिकमुळे मांडीभोवती घट्ट वाटत नाही. कॅज्युअल लूकसाठी उत्तम पर्याय.