लालचुटूक डाळिंब म्हणजे तब्येतीसाठी अमृतच! एकेक दाणा चवीलाच नाही आरोग्यासाठीही उत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 18:52 IST2025-04-22T18:41:29+5:302025-04-22T18:52:05+5:30
The tempting pomegranate is not only delicious but also good for your health : डाळिंब खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. लहान मुलांना तर हा ज्यूस द्यायलाच हवा.

उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर फळे खायला हवी. विविध प्रकारची फळे नियमित खाणे शरीरासाठी फायद्याचे ठरते. फळे चवीलाही छान असतात आणि पौष्टिकही असतात.
डाळिंब्याचे दाणे चवीला फार मस्त लागतात. त्यामुळे लहान मुलेही अगदी आवडीने खातात. डाळिंब खाणे फार फायद्याचे ठरते. रोजच्या आहारामध्ये डाळिंब्याचा समावेश करुन घेणे फार फायद्याचे ठरते.
डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. तसेच विविध जीवनसत्वेही असतात. डाळिंब फायबर मिळवण्यासाठी फार चांगला स्त्रोत आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
हृदयासाठी डाळिंब चांगले असते. हृदयाचे काही त्रास असतील तर रोज एक डाळिंब खाणे फायद्याचे ठरते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी डाळिंब उपयोगी ठरते.
पचनासाठी डाळिंबाचा रस औषधी आहे. पोटाचे त्रास कमी होतात. तसेच डाळिंब पोटाला थंडावा देते.
स्मरणशक्तीसाठी डाळिंबे चांगले असते. मेंदू तल्लख करण्यासाठी त्याची मदत होते. स्मरणाचे आजार उद्भवण्याचा धोका कमी होतो.
वजन कमी करण्यासाठी रोज एक ग्लास डाळिंब ज्यूस पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. ज्याची वजन व्यवस्थापनासाठी मदत होते.
त्वचेसाठी डाळिंब्याची अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्स बाजारात मिळतात. त्वचेसाठी हे फळ फार उपयुक्त असते. त्वचा छान उजळते. तसेच डाग कमी होतात. पिंपल्सचे प्रमाणही कमी होते.
डाळिंब ज्यूस प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो. त्यामुळे दवाखान्यामध्ये भरती असलेल्या रुग्णांना हा ज्यूस दिला जातो. शरीराला ऊर्जा देण्याचे काम डाळिंब करते.