तमन्ना भाटियासारखी परफेक्ट 'फिगर' हवी? एक सोपा फिटनेस मंत्र, तारुण्य कधीच सरणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2025 17:41 IST2025-04-01T17:37:47+5:302025-04-01T17:41:09+5:30

Tamannaah Bhatia fitness routine: Tamannaah Bhatia diet plan: Tamannaah Bhatia workout secrets: Tamannaah Bhatia beauty and fitness: How to stay fit after 35: Anti-aging foods for women: आपल्यालाही तिच्यासारखे शरीर हवे असेल तर फिटनेस आणि डाएट प्लान फॉलो करुन स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकता.

तमन्ना भाटिया ही तिच्या उत्तम अभिनय आणि नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते. जर तिच्यासारखी परफेक्ट फिगर हवी असेल तर फिटनेस आणि डाएट प्लान फॉलो करु शकता. (Tamannaah Bhatia fitness routine)

ती फिटनेस फ्रिक आहे जर आपल्यालाही तिच्यासारखे शरीर हवे असेल तर फिटनेस आणि डाएट प्लान फॉलो करुन स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकता. (Tamannaah Bhatia diet plan)

तमन्ना भाटियाच्या वर्कआउट बद्दल सांगायचे झाले तर, ती तिच्या दिवसाची सुरुवात योगा आणि जॉगिंग ने करते. त्यामुळे ती दिवसभर फ्रेश वाटते. शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी ती नियमितपणे योगा करते.

दररोज जीममध्ये एक तास व्यायाम करुन घाम गाळते. तिच्या व्यायामामध्ये वेट ट्रेनिंग, कार्डिओ आणि फंक्शनल व्यायामाचा समावेश आहे. ज्यामुळे शरीर लवचिक होते.

दिवसाची सुरुवात ही लिंबाचा रस, मध मिसळून कोमट पाणी पिऊन करते. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

सकाळच्या नाश्त्यात भिजवलेले बदाम, इडली, डोसासारखे फायबरयुक्त पदार्थ खाते. ज्यामुळे तिचे पोट भरल्यासारखे वाटते.

ती दिवसातून दोन ते चार लीटर पाणी कमीत कमी पिते. यासोबतच नारळ पाणी, ताज्या फळांचा रस देखील तिला प्यायला आवडतो. कधी तरी पास्ता, चॉकलेट आणि भात यांसारखे पदार्थ ती खाते.

रात्रीच्या जेवणात हाय प्रोटीनयुक्त पदार्थ खायला आवडतात. ज्यामध्ये मासांहरी पदार्थ किंवा ग्रील्ड केलेल्या भाज्या खाते.