'हे' पदार्थ रोज खाणं सुरू करा, वाढलेली चरबी झरझर कमी होऊन दिसाल चवळीची नाजुक शेंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2026 15:09 IST2026-04-01T15:03:35+5:302026-04-01T15:09:55+5:30

वजन वाढायला सुरुवात झाली असेल तर आतापासूनच आहाराबाबत काही नियम पाळायला सुरुवात करायला हवी. या काही साध्या सोप्या गोष्टी तुम्ही नियमितपणे केल्या तरी वजनात खूप फरक दिसून येतो.

कारण या गोष्टींमुळे पचनक्रिया आणि चयापयच क्रिया अधिक चांगली होते आणि त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित झाल्याने शरीरात अतिरिक्त चरबी साचून राहात नाही (start eating 5 foods daily for fast weight loss). त्यासाठी नेमकं काय करायला हवं ते पाहुया...(food that helps for fast weight loss)

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करावी. कोमट पाणी प्यायल्याने पचन चांगलं होतं आणि शिवाय शरीर हायड्रेटेड राहण्यासही मदत होते.

रात्री झोपण्यापुर्वी १ टीस्पून जिरे आणि १ टीस्पून धने १ ग्लास पाण्यात भिजत घालायचे. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आणि गरम करून प्यायचं. यामुळेही चयापचय क्रिया चांगली होते आणि शरीरातली जास्तीची चरबी कमी होण्यास मदत होते.

जेवण झाल्यानंतर नुसतीच बडिशेप खाण्याऐवजी त्यासोबत थोडा ओवा, काळं मीठ असे पदार्थही खा. यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होते.

जेवणाची सुरुवात करण्यापुर्वी सलाड, कोशिंबीर, कडधान्यांच्या उसळी असे पदार्थ खाण्यास भर द्या. या पदार्थांमध्ये फायबर आणि प्रोटीन्स जास्त असल्याने तब्येतीलाही फायदा होतो आणि वजनही कमी होते.

नाश्त्यामध्येही फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात घ्यावे. कारण त्यामुळे पोट पुढे बराच वेळ भरल्यासारखे राहाते आणि शुगर क्रेव्हिंग कमी होते.

















