एका दिवसात किती बदाम खाणं योग्य? भिजवून खावे की तसेच..? पाहा बदाम खाण्याची योग्य पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:22 IST2025-10-31T13:31:13+5:302025-10-31T17:22:53+5:30
Soked Vs Raw Almonds Which Is Better What Is Right Way To Eat Almonds : बदाम भिजवून खाणं हे सर्वोत्तम आहे. रात्रभर भिजवल्यानं बदाम मऊ होतात आणि पचायला सोपे जातात.

दिवसाला किती बदाम खावेत?
साधारणपणे एका निरोगी प्रौढ व्यक्तीनं दिवसाला ५ ते १० बदाम खाणं योग्य मानलं जातं. (How Many Almonds Should You Eat Daily)

जास्त बदाम का खाऊ नयेत?
एकाचवेळी जास्त बदाम खाऊ नयेत. कारण बदामांमध्ये कॅलरी आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. अतिसेवन केल्यास पचायला जड वाटू शकतं. ( What Is Right Way To Eat Almonds)

बदाम कसे खावेत?
बदाम भिजवून खाणं हे सर्वोत्तम आहे. रात्रभर भिजवल्यानं बदाम मऊ होतात आणि पचायला सोपे जातात.

भिजवल्यामुळे काय होतं?
भिजवल्यामुळे बदामातील फायटीक एसिड कमी होते. त्यामुळे शरीराला त्यातील पोषक तत्व शोषून घेणं अधिक सोपं जातं.

तपकिरी त्वचा काढून टाका
भिजवल्यानंतर बदामाची तपकिरी त्वचा काढून खाणं अधिक फायद्याचं ठरतं.

कोरडे बदाम का खाऊ नयेत?
कोरडे बदाम लगेच ऊर्जा देतात पण ते पचायला जास्त वेळ घेतात आणि अनेकांना जड वाटू शकतं.

बदाम कधी खावेत?
भिजवलेले बदाम सकाळच्या वेळेस नाश्त्यासोबत खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते .

गर्भवती महिला, विशेष आरोग्याच्या समस्या असलेल्यांनी बदाम खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच बदामाचे प्रमाण निश्चित करावे.

















