हिवाळ्यात वापरा 'हे' घरगुती फेसवॉश- त्वचा इतकी छान होईल की विकतचे फेसवॉश विसराल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2025 09:35 IST2025-11-18T09:30:40+5:302025-11-18T09:35:02+5:30

हिवाळ्याच्या दिवसात त्वचा खूप जास्त कोरडी होते. त्यामुळे कधी कधी आपण नेहमी वापरत असणारे फेसवॉशही त्वचेला सहन होत नाहीत.

म्हणूनच हिवाळ्यात असं फेसवॉश हवं जे तुमची त्वचा तर स्वच्छ करेलच पण तिला व्यवस्थित हायड्रेटेड, मॉईश्चराईजही करेल.

असंच फेसवॉश घरच्याघरी कसं तयार करायचं ते पाहूया.. यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा मुलतानी माती घ्या आणि त्यात चिमूटभर हळद घाला.

यानंतर त्यामध्ये एक चमचा ॲलोव्हेरा जेल आणि एक चमचा ग्लिसरीन घाला. ग्लिसरीनमुळे त्वचा काेरडी पडत नाही तसेच ॲलोव्हेरा जेलही त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं.

आता या मिश्रणात २ चमचे बेबी लिक्विड सोप आणि थोडं गुलाबपाणी घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि नंतर एका स्प्रे बॉटलमध्य भरून ठेवा.

सकाळ- संध्याकाळ हेच लिक्विड वापरून चेहरा धुवा. काही दिवसांतच त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.
















