शिल्पा शेट्टी म्हणते- तूप नको म्हणू नका, माझ्यासारखं दिसायचं तर रोज 'एवढं' तूप नक्की खा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 16:21 IST2024-12-17T14:36:47+5:302024-12-18T16:21:51+5:30

शिल्पा शेट्टी तिच्या चाहत्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून नेहमीच व्यायामाचे, योग्य आहाराचे महत्त्व पटवून देत असते.(shilpa shetty explains benefits of eating ghee)
तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असून तो desikhanadesivlog या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
यामध्ये शिल्पा असं सांगत आहे की आजकालच्या तरुण मुली तुपाचा खूप जास्त बाऊ करतात. पण असं करू नका. कारण तूप हे अतिशय आरोग्यदायी आहे.
शिल्पा म्हणते की ती दररोज ब्राऊन राईससोबत जवळपास एक ते दिड चमचा एवढं तूप खातेच.. त्यामुळे तूप तुमच्या तब्येतीसाठी गरजेचं आहे. ते खाणं टाळू नका, असं तिने स्पष्टपणे सांगितलं आहे.
तूपामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे एका मर्यादेपर्यंत तूप खाणे आरोग्यासाठी चांगलेच आहे.
शिवाय तुपामध्ये व्हिटॅमिन ई असल्याने तूप सौंदर्यवर्धक आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठीही तूप खाणे फायदेशीर ठरते.