लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 16:33 IST
1 / 6संकष्टी चतुर्थीला (Sankashti Chaturthi) घरोघरी बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक बनवले जातात. पण कामाच्या गडबडीमुळे उकडीचे मोदक बनवणं शक्य होत नाही. कधी उकड बिघडते तर कधी मोदक फाटतात. बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट तयार होतील अशा मोदकांचे प्रकार पाहूया. (Modak Recipe) 2 / 6 चण्याची डाळ गूळ घालून शिजवून त्याचं पुरण तयार करा. गव्हाच्या पीठाचं, मैद्याच्या पीठाचं आवरण तयार करून मोदकांचा आकार देऊन तळून घ्या.3 / 6काकडी सालं काढून किसून घ्या. नंतर एक कढईत तूप, साखर, पाणी घाला आणि काकडीचा किस घाला. एक उकड काढल्यानंतर यात रवा घाला. मंद आचेवर काकडी आणि रव्याचं मिश्रण एकजीव होऊ द्या. त्यात परत तूप घालून गॅस बंद करा. मोदकांच्या साच्याला तूप लावून त्यात शिजलेलं मिश्रण घाला. तयार आहेत काकडीचे मोदक.4 / 6 भाजलेले शेंगदाणे, तीळ मिक्सरमधून वाटून घ्या. नंतर तूप आणि गुळात हे मिश्रण एकत्र करा. यात तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता. तयार मिश्रण मोदकाच्या साच्यात घालून मोदक तयार करा. 5 / 6मूग डाळ भाजून मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात ड्रायफ्रुट्स, पीठी साखर शेवटी तूप घाला. हे मिश्रण एकजीव करून साच्यात घालून मोदक तयार करा.6 / 6नारळ, रवा आणि अननसाचे, तूप, साखर, ड्रायफ्रुट्स हे जिन्नस तुम्हाला मोदक बनवण्यासाठी लागतील. आधी पाणी, पायनॅपल इसेंस, रवा घालून उकड तयार करून घ्या. नंतर नारळ आणि साखरेचं फिलिंग घालून त्यात रवा अननसाचे