शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sabyasachi Outfit : दीपविरपासून विरुष्कापर्यंत सब्यसाचीच्या डिजायनर आऊटफिटमध्ये झळकली ही जोडपी; पाहा भन्नाट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 5:48 PM

1 / 11
फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) मंगळसुत्राच्या जाहिरामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. .(Sabyasachi Bold Mangalsutra advertise goes Viral) प्रसिद्ध अभनेत्री कटरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल आपल्या लग्नाच्या बातम्यांवरून चर्चेत आहेत. रिपोर्ट्नुसार या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली असून लग्नाचं ठिकाणही निश्चित झालं आहे. कॅटरिना आपल्या लग्नात सब्यसाचीच्या आऊटफिटमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.
2 / 11
सब्यसाची हा डिजायनर ब्रॅण्ड ड्रेस बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. नेहा कक्कर, दीपिका आणि अनुष्कासुद्धा सब्यसाचीनं डिजाईन केलेल्या ड्रेसमध्ये दिसून आली होती. आज आम्ही तुम्हाला अशाच काही जोडप्यांचे फोटो दाखवणार आहोत ज्यांनी सब्यसाचीनं डिजाईन केलेले ड्रेस परिधान केले होते.
3 / 11
बॉलिवूडच्या सगळ्यात चर्चेत असलेल्या लग्नांपैकी हे एक लग्न होतं. अनुष्का विराटच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यावेळी अनुष्कानं पेस्टल पिंक रंगाचा लेहेंगा घातला होता.
4 / 11
त्यानंतर या पिंक लेहेग्यांचा ट्रेंड तरूणींमध्ये खूप फेमस झालेला पाहायला मिळाला.
5 / 11
बॉलिवूडमध्ये दीपवीरची जोडी आपल्या हटके आऊटफिट्समुळे नेहमीच चर्चेत असते. इटलीमध्ये पार पडलेल्या विवाह सोहोळ्यात दीपिकानं लाल रंगाचा स्टनिंग लेहेंगा घातला होता.
6 / 11
या दोघांचेही ब्रायडल लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दीपिकानं लग्नाआधीच सांगितलं होतं की, जेव्हाही तिचं लग्न होईल तेव्हा ती सब्यसाची ब्राईड बनणं पसंत करेल.
7 / 11
आयशा चित्रपटात सोनम कपूरसोबत झळकलेल्या अमृता पुरीनं आपल्या सुंदर ब्रायडल लूकनं सगळ्यांना इम्प्रेस केलं होतं. २००७ मध्ये तिनं बँकॉकला लग्न केलं. आपल्या लग्नात तिनं सब्यसाचीनं डिजाईन केलेला सिल्कचा हेवी लेहेंगा परिधान केला होता.
8 / 11
सैफ अली खानची बहिण सोहा अली खाननं आपल्या लग्नात रॉयल ब्रायडल लूक कॅरी केला होता. सोहानं लग्नात सब्यसाचीचा गोल्ड लेहेंगा परिधान केला होता.
9 / 11
सागरिका घाटनेनं क्रिकेटर जहिर खानसह कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर तिनं एक रिसेप्शन पार्टी होस्ट केली होती. यावेळी तिनं सब्यसाची कलेक्शनचा गोल्डन लेहेंगा निवडला होता. सागरिका या लूकमध्ये खूप सुंदर दिसून आली.
10 / 11
बिपाशाचं लग्न करण ग्रोव्हरसह बंगाली रिती रिवाजांनी झालं होतं. बिपाशानं आपल्या लग्नात सब्यसाचीनं डिजाईन केलेला लाल रंगाचा हेवी लेहेंगा परिधान केला होता. आपल्या सुंदर ब्रायडल लूकवर बिपाशानं हेवी ज्लेवरी वेअर केलेली दिसून आली.
11 / 11
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सब्यसाची डिजाईंन्सची नेहमीच फॅन राहिली आहे. विद्यानं आपल्या लग्नात लाल रंगाची बनारसी साडी घातली होती. सब्यसाचीनं डिजाईन केलेल्या या साडीत विद्या बालनचा लूक खूप सिंपल, क्लासी दिसत होता.
टॅग्स :Sabyasachiसब्यसाचीBeauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशनDeepika Padukoneदीपिका पादुकोणBipasha Basuबिपाशा बासूVidya Balanविद्या बालनSoha Ali Khanसोहा अली खानamrita puriअमृता पुरीKatrina Kaifकतरिना कैफ