दूध नासलं? नो टेंन्शन! पनीर करण्यासोबतच आहेत ९ भन्नाट फायदे - शेजारीही विचारतील तुमचे स्पेशल सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2026 18:33 IST2026-02-14T14:42:48+5:302026-02-15T18:33:16+5:30

reuse spoiled milk kitchen hacks : make these amazing things from curdled milk : uses of curdled milk at home : नासलेलं दूध स्वयंपाक, सौंदर्य उपचार आणि घरगुती कामांसाठीही अतिशय उपयुक्त ठरू शकतं...

शक्यतो, दूध नासलं (how to use spoiled milk) किंवा फाटलं की आपण ते वाया जाऊ नये म्हणून लगेच त्याचे पनीर तयार करतो. बहुतेकवेळा तर दूध नासलं की आपल्याला ते वाया गेल्यासारखंच वाटत...पण खरंतर, फाटलेलं दूध अजिबात टाकून देण्यासारखं नसतं...सहसा अशा दुधापासून घरोघरी हमखास पनीरच बनवले जाते, मात्र त्याचा उपयोग फक्त पनीरपुरताच मर्यादित नाही. योग्य पद्धतीने वापर केला तर नासलेलं दूध स्वयंपाक, सौंदर्य उपचार आणि घरगुती कामांसाठीही अतिशय उपयुक्त ठरू शकतं. मग, फाटलेल्या दुधाचे पनीर तयार करण्याव्यतिरिक्त आणखी कशा पद्धतीने उपयोगात आणता येईल ते पाहूयात...त्यामुळे पुढच्या वेळी दूध नासलं तर ते फेकून देण्याऐवजी त्याचे हे सोपे आणि भन्नाट उपयोग नक्की करून पाहा... (uses of curdled milk at home)

केक, पॅनकेक्स किंवा मफिन्स बनवताना दह्याऐवजी किंवा पाण्याऐवजी फाटलेल्या दुधाचा वापर केल्यास बेक केलेले पदार्थ अधिक जाळीदार आणि स्पंजी होतात.

दूध फाटल्यावर जे पाणी उरते, त्याला 'व्हे प्रोटीन' (Whey) म्हणतात. हे पाणी फेकून न देता त्याने चपाती किंवा पराठ्याची कणिक मळा. यामुळे चपात्या अत्यंत मऊ होतात आणि त्यांना चांगली चव येते आणि पोषणमूल्यही वाढते.

जर तुम्ही रस्सा भाजी किंवा आमटी बनवत असाल, तर साध्या पाण्याऐवजी फाटलेल्या दुधाचे पाणी वापरा. यामुळे भाजीची ग्रेव्ही दाट होते आणि भाजीला एक वेगळीच चव मिळते.

भात किंवा पुलाव शिजवताना पाण्याचा वापर करण्याऐवजी फाटलेल्या दुधाचे पाणी वापरल्यास भात अधिक मऊ आणि सुटसुटीत होतो. विशेषतः बिर्याणी किंवा पुलावमध्ये याचा वापर केल्यास पदार्थाचा स्वाद वाढतो.

फाटलेले दूध किंवा त्याचे पाणी त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. चेहऱ्यावर लावण्यासाठी याचा वापर फेसपॅकमध्ये केल्यास त्वचा मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते. फाटलेल्या दुधात लॅक्टिक अ‍ॅसिड असते, जे त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते. या नासलेल्या दुधात बेसन किंवा मध मिसळून फेसपॅक म्हणून वापरल्यास त्वचा मऊ आणि उजळ दिसते.

सूपला अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनवण्यासाठी फाटलेल्या दुधाच्या पाण्याचा वापर करू शकता. हे पाणी प्रोटीनयुक्त असल्याने सूपला दाटपणा येतो आणि ते अधिक पौष्टिक होते.

नासलेल्या दुधाचे पाणी केसांना लावून १० ते १५ मिनिटांनी केस धुतल्यास, केस मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते.

पाण्यात मिसळून थोड्या प्रमाणात रोपांना घातल्यास मातीतील पोषण वाढते आणि रोपांची वाढ सुधारते.

नासलेले दूध डिप्स आणि सॅलड ड्रेसिंग बनवण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. यामध्ये थोडे मीठ, काळी मिरी, लसूण आणि हर्ब्स (Herbs) घालून चांगले फेटून घ्या. यापासून तयार केलेले डिप भाज्या आणि स्नॅक्ससोबत चविष्ट लागते.